शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Delhi Violence : दिल्लीतल्या हिंसेवरून रजनीकांंत मोदी सरकारवर भडकले; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 22:19 IST

दंगेखोरांना वेळीच आवार घातला पाहिजे. खरं तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो.

ठळक मुद्देदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिल्लीत भडकलेल्या हिंसेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत समाजकंटकांनी जो काही हिंसाचार घडवला आहे, त्यात दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांना वेळीच आवार घातला पाहिजे. खरं तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो.

नवी दिल्लीः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिल्लीत भडकलेल्या हिंसेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत समाजकंटकांनी जो काही हिंसाचार घडवला आहे, त्यात दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांना वेळीच आवार घातला पाहिजे. खरं तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो. तसेच भाजपाशी त्यांचे संबंध जोडल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला दंगेखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असं रजनीकांत यांनी थेट आव्हानच दिलं आहे. परंतु त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. यात कुठे ना कुठे सरकारचंही अपयश आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याचा हवाला देत रजनीकांत म्हणाले, जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा केंद्रानं सावधानता बाळगण्याची गरज होती. आयबीनं आपलं काम नीट केलं नाही. हिंसा पसरवण्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे होती. आता तरी आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सावधान व्हाल, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला. विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी हिंसक होण्याची आवश्यकता नाही. जर सीएएनं खरंच मुस्लिमांचं नुकसान होणार असल्यास मी त्यांच्यासोबत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून दंगेखोरांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यासाठी  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत हिंसाचार रोखण्यासाठी सर्वपक्षीय मिळून प्रयत्न करू, असे सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत एक ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिल्लीकरांना  शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. 'शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्त्वाचं आहे' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकCentral Governmentकेंद्र सरकारdelhi violenceदिल्ली