मराठी कुटुंबातील दोन बहिणींच्या हत्येने राजधानी दिल्ली हादरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 22:00 IST2018-10-25T22:00:22+5:302018-10-25T22:00:53+5:30
मराठी कुटुंबातील दोन बहिणींची त्यांच्या राहत्या घरीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना राजधानी नवी दिल्लीत घडली.

मराठी कुटुंबातील दोन बहिणींच्या हत्येने राजधानी दिल्ली हादरली
नवी दिल्ली - मराठी कुटुंबातील दोन बहिणींची त्यांच्या राहत्या घरीच हत्या झाल्याची धक्कादायक घटना राजधानी नवी दिल्लीत घडली. दिल्लीमधील पश्चिम विहार परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये हा दुहेरी हत्याकांडाचा प्रकार घडला आहे. या हत्याकांडामागे घरात काम करण्यासाठी आलेल्या प्लंबरचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत असलेल्या मराठी सोसायट्यांपैकी आनंदवन सोसायटी एक आहे. याच सोसायटीत पाठक कुटुंबीय वास्तव्यास होते.
Delhi: Two sisters found murdered at their residence in Paschim Vihar; Police present at the spot, CCTV footage being examined.
— ANI (@ANI) October 25, 2018