शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप म्हणाला- शेतकऱ्यांनी लाल किल्ला 'अपवित्र' केला; काँग्रेसनं करून दिली 'दुर्योधना'ची आठवण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2021 14:40 IST

राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतशेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान लाल किल्ल्यात झालेल्या हिंसाचारासंदर्भात भाजप आणि काँग्रेसने प्रतिक्रिया दिल्या आहेत. यासंदर्भा बोलताना, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच शेतकऱ्यांनी लाल किल्ला अपवित्र केला, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता शाहनवाज हुसैन यांनी म्हटले आहे. तर, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी 'दुर्योधना'चा उल्लेख करत नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 

काय आली भाजपची प्रतिक्रिया...?भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले, ''जी शंका होती, ते खरे ठरले. शेतकरी संघटना मोठ-मोठ्या गप्पा मारत होत्या, की शिस्त राखली जाईल. आम्ही आनंदोत्सवात सहभागी होत आहोत. हा आनंदोत्सव होता, की प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारतावर हल्ला होता? यांनी लाल किल्ला अपवित्र केला आहे. यासंर्वांविरोधात कठोर कारवाई व्हायला हवी.'' एवढेच नाही, तर ''भडकावण्याचे काम तर शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले. शेतकरी संघटनेचे नेते केवळ भडकावण्याचेच काम करत होते आणि आता घटना घडून गेल्यानंतर ते आपले ज्ञान पाझळत आहेत,'' असेही शाहनवाज हुसैन  म्हणाले.

काँग्रेसची प्रतिक्रिया -काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी महाभारताचा उल्लेख करत म्हणाले आहे, ''महात्मा विदूर यांच्या सारखे मंत्री, कृपाचार्यांसारखे राजगुरू, द्रोणाचार्यांसारखे महारथी आणि भीष्मांसारखे "मार्गदर्शक" असतानाही हस्तिनापूरचा सर्वनाश कसा झाला? कारण दुर्योधनाच्या अहंकारापुढे सर्व मौन राहिले आणि या मौनाची "किंमत" सर्वांनाच चुकवावी लागली. वाटले, आठवन करून द्यावी. #Farmer''

सरकारने या हिंसाचाराला गांभीर्याने घ्यावे - मायावतीयासंदर्भात, बसपाच्या सर्वेसर्वा मायावती म्हणाल्या, ''देशाच्या राजधानीत काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान जे काही घडले, ते कदापी व्हायला नको होते. हे अत्यंत दुर्दैवी आहे. केंद्रातील सरकारनेही हे गांभीर्याने घ्यायला हवे. याच बरोबर, बसपा केंद्र सरकारला पुन्हा विनंती करते, की त्यांनी हे तीनही कृषी कायदे विलंब न करता परत घ्यावेत आणि शेतकऱ्यांचे आंदोलन संपवावे, जेनेकरून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये.''

दिल्ली हिंसाचारात 300 पोलीस कर्मचारी जखमी -राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनप्रसंगी शेतकरी आंदोलकांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. या हिंसाचारानंतर पोलिसांनी 22 एफआयआर नोंदवल्या आहेत. हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास क्राइम ब्रांच, स्पेशल सेलकडे सोपविण्यात आला आहे.

टॅग्स :delhi violenceदिल्लीFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस