संतापजनक ! प्रियकरानं गर्लफ्रेन्डचा न्यूड फोटो काढून करायला सांगितला डान्स, यानंतर सुरू केले ब्लॅकमेलिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 13:27 IST2018-02-23T13:27:01+5:302018-02-23T13:27:06+5:30
प्रियकरानं नग्नावस्थेतील फोटो काढून, नंतर याच अवस्थेत जबरदस्तीनं डान्स करायला लावल्याचा गंभीर आरोप एका शाळकरी विद्यार्थिनीनं केला आहे. राजधानी नवी दिल्लीतील हा धक्कादायक प्रकार आहे.

संतापजनक ! प्रियकरानं गर्लफ्रेन्डचा न्यूड फोटो काढून करायला सांगितला डान्स, यानंतर सुरू केले ब्लॅकमेलिंग
नवी दिल्ली - प्रियकरानं नग्नावस्थेतील फोटो काढून, नंतर याच अवस्थेत जबरदस्तीनं डान्स करायला लावल्याचा गंभीर आरोप एका शाळकरी विद्यार्थिनीनं केला आहे. राजधानी नवी दिल्लीतील हा धक्कादायक प्रकार आहे. या विद्यार्थिनीनं प्रियकरावर ब्लॅकमेल केल्याचाही आरोप केला आहे. कथितरित्या नग्नावस्थेतील फोटो काढून डान्स करायला लावल्याचा गंभीर आरोप एका विद्यार्थिनीनं आपल्या प्रियकरावर केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एका उच्चभ्रू वस्तीतील ही घटना आहे. मुलीनं केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या प्रियकरानं बहाण्यानं तिला साऊथ एव्हेन्यूमधील आपल्या रुमवर घेऊन गेला आणि जेथे त्यानं प्रेयसीचा नग्नावस्थेली फोटो काढला आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत जबरदस्तीनं तिला त्याच अवस्थेत डान्स करायला लावल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर प्रियकरानं डान्स करताना तिला जबरदस्तीनं अश्लिल चाळे करण्यासही भाग पाडल्याचा आरोप पीडित मुलीनं केला आहे. नग्नावस्थेतील फोटो काढल्यानंतर प्रियकरानं तिला एवढं ब्लॅकमेल केल्यानं प्रचंड घाबरलेली आहे.
आरोपी मुलगा साऊथ एव्हेन्यमध्ये भाडोत्री म्हणून वास्तव्यास होता आणि काही दिवसांपासून पीडित मुलीसोबत त्याची ओळk झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 31 जानेवारीला घडलेली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस सखोल चौकशी सुरू केली असून आरोपी शोध सुरू करण्यात आला आहे.