शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिल्ली सेवा विधेयक कायदा बनले! राष्ट्रपतींची मंजुरी, भारत सरकारची अधिसूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 13:05 IST

दिल्ली सेवा विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. या विधेयकाला राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाली आहे. भारत सरकारने त्याची अधिसूचना जारी केली आहे.

दिल्ली सेवा विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. आता दिल्लीत कायदा झाला आहे. भारत सरकारच्या अधिसूचनेत, गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली कायदा २०२३ लागू करण्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी १ ऑगस्ट रोजी संसदेत राष्ट्रीय राजधानी प्रदेश सरकार विधेयक, २०२३ सादर केले होते. 

धीर, अधीर अन् बधिर!  ज्या मणिपूरमुळे हा अविश्वासाचा अध्याय रचला गेला त्या...

सरकारने म्हटले आहे की, या कायद्याला राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली (सुधारणा) कायदा, २०२३ असे म्हटले जाईल. हा कायदा १९ मे २०२३ पासून लागू मानले जाईल. काही तरतुदी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली ऍक्ट, १९९१ सरकारच्या कलम 2 च्या खंड (ई) मध्ये समाविष्ट केल्या होत्या. 'लेफ्टनंट गव्हर्नर' म्हणजे दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशासाठी घटनेच्या कलम २३९ अंतर्गत नियुक्त केलेला आणि राष्ट्रपतींद्वारे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्त केलेला प्रशासक असणार आहे.

राष्ट्रीय राजधानीतील अधिकार्‍यांचे निलंबन आणि चौकशी यासारख्या कृती केंद्राच्या नियंत्रणाखाली असतील, असा प्रस्ताव या विधेयकात आहे. मणिपूर हिंसाचारावर लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ होत असताना १ ऑगस्ट रोजी तो संसदेत मांडण्यात आला होता. बहुतांश विरोधी पक्ष या विधेयकाच्या विरोधात होते.

दिल्ली सेवा विधेयकावर चर्चेनंतर १ ऑगस्टच्या संध्याकाळी राज्यसभेत मतदान झाले. यामध्ये दिल्ली सेवा विधेयक १३१ मतांनी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या विरोधात फक्त १०२ मते पडली. राज्यसभेत मतदानासाठी अगोदर मशीनद्वारे मतदानाची तरतूद स्पष्ट करण्यात आली. मात्र काही वेळाने उपसभापतींनी मशीनमध्ये काही बिघाड असल्याने स्लिपद्वारे मतदान होणार असल्याचे जाहीर केले. याआधी हे विधेयक विरोधी पक्षांच्या बहिष्कारात लोकसभेत आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले होते. 

विधेयक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन नाही: अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत सांगितले होते की, हे विधेयक कोणत्याही कोनातून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत नाही याचा पुरावा देऊ. हे विधेयक म्हणजे दिल्लीतील केंद्र सरकारच्या विद्यमान अध्यादेशाची जागा घेण्याचा प्रयत्न आहे. शहा म्हणाले की, हे विधेयक कोणत्याही पंतप्रधानांना वाचवण्यासाठी नाही. काँग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, असा गदारोळ होत असताना अमित शहा म्हणाले, ‘आप’च्या मांडीवर बसलेल्या काँग्रेसने हे विधेयक यापूर्वी आणले होते.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपाAmit Shahअमित शाहArvind Kejriwalअरविंद केजरीवाल