दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:16 IST2025-11-11T15:14:36+5:302025-11-11T15:16:24+5:30
निघाली जैश-ए-मोहम्मदची महिला कमांडर, हाफिदच्या बहिणीशी होती संपर्कात

दिल्ली लाल किल्ला कार स्फोट: फरिदाबादमधून अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदचा पहिला फोटो समोर
भारताच्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राजधानी दिल्ली येथील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. हा दहशतवादी हल्ला आहे की नाही, याबाबत अद्याप तपास यंत्रणांनी स्पष्टीकरण दिलेले नाही. पण याचदरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. संशयित दहशतवादी कारवायांच्या आरोपाखाली फरीदाबादमध्ये शाहीन शाहिद नावाच्या एका महिला डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. शाहीनचे दहशतवादी संघटना जैशसोबत कनेक्शन तपासात पुढे आले आहे. तसेच तिचा पहिला फोटो समोर आला आहे.
डॉ. शाहीन शाहिद ही जैशची महिला कमांडर असल्याचे म्हटले जाते. तिला भारतातील "जमात-उल-मोमिनत"ची कमांड देण्यात आली होती. महिलांना मानसिक युद्ध, प्रचार आणि निधी संकलन यासारख्या कामांमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. भारतातील या सर्व देशविरोधी कारवाया करण्याचे काम शाहीनकडे सोपवण्यात आले होते.

डॉ. शाहीन शाहिद कोण आहे?
डॉ. शाहीन शाहिद ही लखनौची रहिवासी आहे आणि फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठात काम करते. मुझम्मिलने दिलेल्या माहितीच्या आधारे फरिदाबाद पोलिसांनी तिला अटक केली. तिला त्याच्या कारमध्ये एके-४७ लपवण्याची परवानगी दिली होती. तपासात असे दिसून आले की ती या दहशतवादी नेटवर्कचा भाग होती. ती जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरची बहीण शाहिदा अझहरच्या संपर्कात होती. तिच्या सांगण्यावरून ती भारतात जैशसाठी महिला दहशतवादी ब्रिगेड तयार करत होती. ती जैशच्या जमात उल मोमिनात संघटनेशी संलग्न होती.
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील डॉक्टर
सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर देशभरातील अनेक डॉक्टर्सची चौकशी सुरू आहे. या प्रकरणासंदर्भात सध्या अनेक डॉक्टर्सची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, अनेक डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवरही आहेत. स्फोटानंतर लखनौ ते काश्मीरपर्यंत अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. तपास यंत्रणांना असे वाटते की हे सर्व डॉक्टर एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांनीच दिल्ली बॉम्बस्फोट घडवून आणला आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक डॉक्टर्सची धरपकड करण्यात आली आहे, तर अनेक ठिकाणी छापेमारीही सुरू आहे.