Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:34 IST2025-11-11T13:33:06+5:302025-11-11T13:34:38+5:30
Delhi Red Fort Blast : दिल्लीतल लाल किल्ल्यासमोर झालेल्या बॉम्बस्फोटाला दहशतवादी हल्ला घोषित करण्यात आला असून त्यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचा इशारा दिला आहे.

Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
Delhi Red Fort Blast : लाल किल्ल्यासमोर झालेल्या स्फोटानंतरदिल्ली हाय अलर्टवर आहे. काल रात्रीपासूनच तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. लाल किल्ल्यावर झालेला कार स्फोट हा दहशतवादी हल्ला होता हे स्पष्ट झाले आहे, यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही या हल्ल्याबाबत इशारा दिला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, या स्फोटाचा कट रचणाऱ्यांना कोणत्याही किंमतीत माफ केले जाणार नाही. त्यांना कठोर शिक्षा मिळेल. "या स्फोटाची चौकशी केली जात आहे. चौकशीत जे काही उघड होईल ते लोकांसमोर ठेवले जाईल. मी देशाला खात्री देऊ इच्छितो की या हल्ल्यासाठी जो कोणी जबाबदार असेल त्याला कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असा इशारा सिंह यांनी दिला.
संरक्षणमंत्र्यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले. यावेळी त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. "या घटनेत जीव गमावलेल्यांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी पीडितांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो", असेही ते म्हणाले.
दिल्ली पोलिसांनी याला दहशतवादी हल्ला म्हटले
लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण राजधानीत हादरली आहे. दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे लाल किल्ल्यासमोर झालेला कार बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे पुष्टी केली आहे.