दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 01:36 IST2025-11-11T01:34:17+5:302025-11-11T01:36:28+5:30
Delhi Red Fort Blast : राजधानी दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. आता या स्फोटाच्या तपासादरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
राजधानी दिल्लीमधीललाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ झालेल्या भीषण स्फोटांमुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या स्फोटात सुमारे ८ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा स्फोट नेमका कसा झाला, याचा शोध घेतला जात आहे. आता या स्फोटाच्या तपासादरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या हुंडई आय-२० कारमध्ये हा स्फोट झाला, त्या कारची अनेकदा खरेदी विक्री झाली होती. तसेच या कारचं पुलवामा कनेक्शनही समोर आलं आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आय-२० कारची अनेकदा खरेदी विक्री झाल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे. त्यातील धक्कादायक बाब म्हणजे ही कार पुलवामा येथील तारिक याला विकण्यात आली होती. कारच्या खरेदी विक्रीसाठी बनावट कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता. त्यामुळे या कारच्या खऱ्या मालकाची ओळख पटू शकलेली नाही. त्यामुळे या कटात सहभागी असलेल्या लोकांच्या हेतूबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तत्पूर्वी ही कार हरयाणामधील गुरुग्राम येथील सलमान यांची होती आणि त्यांनी तिची विक्री केली होती, असे वृत्त समोर आले होते. या कारची गुरुग्राममध्ये नोंद करण्यात आली होती. तसेच २० सप्टेंबर रोजी फरिदाबादमध्ये चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याने या कारवर दंडात्मक कारवाईही झाली होती.