दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 02:15 IST2025-11-11T02:14:39+5:302025-11-11T02:15:53+5:30
Delhi Red Fort Blast : सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतील लाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची आणि २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत.

दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
सोमवारी संध्याकाळी राजधानी दिल्लीतीललाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटामध्ये आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याची आणि २० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहेत. यातील जखमींना लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या स्फोटामधील जखमी आणि मृतांपैकी काहींची नावं आणि माहिती समोर आली आहेत. ती पुढील प्रमाणे.
लाल किल्ला स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची नावं
१) शायना परवीन, ख्वाब बस्ती, मिर्क रोड दिल्ली (जखमी)
२) हर्षुल सेठी, गदरपूर, उत्तराखंड (जखमी)
३) शिवा जायसवाल, देवरिया, उत्तर प्रदेश (जखमी)
४) समीर, मंडावली, दिल्ली (जखमी)
५) जोगिंदर, नंद नगरी, दिलशाद गार्डन, दिल्ली (जखमी)
६) भवानी शंकर सहरमा, संगम विहार, दिल्ली (जखमी)
७) अज्ञात, (मृत)
८) गीता, कृष्णा विहार, दिल्ली (जखमी)
९) विनय पाठक, आयानगर, दिल्ली (जखमी)
१०) पप्पू, आग्रा, उत्तर प्रदेश (जखमी)
११) विनोद सिंह, बटजीत नगर, दिल्ली (जखमी)
१२) शिवम झा, उस्मानपूर, दिल्ली (जखमी)
१३) अज्ञात (जखमी)
१४) मोहम्मद शहनवाज, दरियागंज, दिल्ली (जखमी)
१५) अंकुश शर्मा, ईस्ट रोहताशनगर, शाहदरा (जखमी)
१६) अशोक कुमार, हसनपूर, अमरोहा,उत्तर प्रदेश (मृत)
१७) अज्ञात (मृत)
१८) मोहम्मद फारुख, दरियागंज, दिल्ली (जखमी)
१९) तिलक राज, रोहमपूर, हिमाचल प्रदेश (जखमी)
२०) अज्ञात (जखमी)
२१) अज्ञात (मृत)
२२) अज्ञात (मृत)
२३) अज्ञात (मृत)
२४) मोहम्मद सफवान, सीतारामबाग, दिल्ली (जखमी)
२५) अज्ञात (मृत)
२६) मोहम्मद दाऊद, अशोक विहार, गाझियाबाद (जखमी)
२७) किशोरीलाल, यमुनाबाजार, काश्मिरी गेट, दिल्ली (जखमी)
२८) आझाद, कर्तारनर, दिल्ली (जखमी)
या स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.