राजधानी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ उभ्या असलेल्या एका कारमध्ये सोमवारी मोठा स्फोट झाला. सुरुवातीच्या रिपोर्टनुसार यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २० हून अधिक जखमी झाले. मात्र आता मृतांचा आकडा वाढला आहे. लेटेस्ट अपडेट्सनुसार, मृतांची संख्या १२ झाली आहे आणि जखमींची संख्या २५ झाली आहे.
कारस्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते. जखमींमध्ये गौरी शंकर मंदिरातून परतणारे अंकुश शर्मा (२८) आणि राहुल कौशिक (२०) यांचा समावेश आहे. स्फोटात अंकुशचे शरीर सुमारे ८० टक्के भाजले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.
"आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचं तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामागील हेतू निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित एजन्सी प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत.
वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहिणींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
स्फोटानंतर दिल्ली पोलिसांनी शहरात सुरक्षा वाढवली आहे. राजधानीतील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय अलर्ट ठेवण्यात आला आहे. रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), जीआरपी आणि प्रमुख स्थानकांवर श्वान पथकं तैनात करण्यात आली आहेत. कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, तर प्रवाशांची तपासणी आणि गस्त देखील वाढवण्यात आली आहे.
"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, स्फोट अत्यंत स्फोटक पदार्थामुळे झाला होता, ज्यामुळे जवळपासची अनेक वाहनं उद्ध्वस्त झाली आणि जवळच्या इमारतींच्या खिडक्या फुटल्या. स्फोटात वापरल्या जाणाऱ्या स्फोटकांचा प्रकार निश्चित करण्यासाठी फॉरेन्सिक पथके ढिगाऱ्यांचे नमुने तपासत आहेत. या घटनेनंतर दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि स्फोटक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Web Summary : A car explosion near Delhi's Red Fort metro station killed 12 and injured 25. The blast, possibly a suicide attack, damaged nearby vehicles. Police have heightened security across the city, investigating the incident under UAPA and explosives act.
Web Summary : दिल्ली के लाल किला मेट्रो स्टेशन के पास एक कार में विस्फोट से 12 लोगों की मौत हो गई और 25 घायल हो गए। विस्फोट, संभवतः एक आत्मघाती हमला था, जिससे आसपास के वाहन क्षतिग्रस्त हो गए। पुलिस ने शहर में सुरक्षा बढ़ा दी है।