शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

दिल्ली प्रदूषण : पंजाबमध्ये आपच्या आमदारानेच जाळले पिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 17:05 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ...

चंदीगड - धुरक्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढल्याने दिल्लीकरांना सध्या जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.  पंजाब आणि हरयाणातील शेतकरी शेतातील पाचट जाळत असल्याने होणारा धूर दिल्लीतील प्रदूषणास कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांना शेतातील पाचट जाळण्यापासून रोखण्याची विनंती केली आहे. मात्र दुसरीकडे पंजाबमध्ये आपचा आमदारच शेतातली पीक जाळत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते सूरपाल खैरा हे शेतात पिक जाळताना दिसत आहेत.  दरम्यान, सुरपाल खैरा यांनी आपण येथील शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी शेतातील पिक जाळत असल्याचे म्हटले आहे. खैरा यांनी 15 ऑक्टोबरला लुधियानामधील समराला येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. त्यांनी शेतातील पाचट जाळल्यामुळे शेतकऱ्यांना करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात आपल्या शेतातील पीक जाळून निषेध नोंदवला होता.  शेतातील पाचट जाळणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश देणाऱ्या  पंजाब सरकारविरोधातील हे आंदोलन असल्याचा दावा सुरपाल खैरा यांनी केला आहे. तसेच सरकारने शेतकऱ्यांना त्रास देणे बंद केले पाहिजे, तसेच शेतामधील पाचटीची विल्हेवाट लावण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना आवश्यक असलेली साधने उपलब्ध करून दिली पाहिजे, असेही खैरा म्हणाले.  दिल्लीला धुरक्यापासून वाचवण्यासाठी केजरीवाल यांनी पंजाब आणि हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतातील पाचट जाळल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर तिन्ही राज्यांनी मिळून उपाय शोधला पाहिजे, असे सूचवले होते. त्याला उत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या कामात राज्याची नव्हे तर केंद्राची भूमिका महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तर खट्टर यांनी हरयाणा सरकार आपल्या पातळीवर योग्य ती कारवाई करत असल्याचे उत्तर दिले होते.    दिल्लीत घेतला जाणारा प्रत्येक श्वास विषारी झाला असून, राजधानीची स्थिती गॅस चेंबरसारखी झाली आहे. खुल्या हवेत श्वास घेणेही कठीण झाले असून, लोक मास्क लावून बाहेर पडत आहेत. प्रदूषित हवेमुळेशाळकरी विद्यार्थ्यांना धोका निर्माण झाल्याने उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी रविवारपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. घनटाद धुक्यामुळे पंजाब, हरयाणा व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात झालेल्या अपघातांमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे.सर्वसाधारण हवेच्या तुलनेत २० पट घनदाट आणि प्रदूषणाचे मिश्रण असलेले धुरके दिल्लीत पसरलेले आहे. यामुळे दिवसा दृश्यमानता कमी झाली होती. धुरक्यामध्ये फिरताना अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होत होती. अनेकांना श्वसनाचे, खोकल्याचे विकार होत आहेत. डोळ्यांमध्ये आग होणे, अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गतवर्षीेच्या तुलनेत यंदा प्रदूषण जास्त आहे. 

टॅग्स :pollutionप्रदूषणNew Delhiनवी दिल्लीFarmerशेतकरीAAPआपMLAआमदार