शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

फक्त दिल्लीच नाही, तर पाकिस्तानपासून बंगालपर्यंत प्रदूषण, NASA ने दाखवला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 18:57 IST

दिल्ली-एनसीआरसह आजुबाजूच्या परिसरात भीषण प्रदूषण झाले आहे.

Pollution in India: उत्तर भारतीयांना सध्या श्वास घेणेही अवघड झाले आहे. राजधानी दिल्लीसह एनसीआर आणि आजुबाजूचा परिसर गॅस चेंबर बनला आहे. पंजाबच्या हजारो शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे शेतात जाळलेल्या गवतामुळे, वाहनांचे प्रदूषण आणि कारखान्यांमधून निघणाऱ्या घातक धुरामूळे सर्वत्र भीषण प्रदूषम झाले आहे. दिल्लीसह संपूर्ण एनसीआरमधील पुढील काही दिवसांसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, नासाने सॅटेलाईट इमेज प्रसिद्ध करून हे प्रदूषण केवळ उत्तर भारतातच नाही, तर बंगालच्या उपसागरापर्यंत पसरल्याची माहिती दिली आहे.

NASA चा डेटा दर्शवतो की, 29 ऑक्टोबरपासून शेतातील वाळलेले गवत जाळण्याच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ऑक्टोबर 29 मध्ये 1,068 शेतातील आगीच्या घटनांसह 740 टक्के वाढ झाली. चालू हंगामातील एका दिवसातील हा उच्चांक आहे. सुप्रीम कोर्टाने दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारांना शेतातील आग रोखण्यासाठी केंद्राशी त्वरित चर्चा करण्यास सांगितले आहे. 

नासाच्या सॅटेलाइट इमेज खूप भीषण आहेत. विषारी धूर पाकिस्तानमधून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेला दिसतोय. या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे. नासाने 1 आणि 8 नोव्हेंबरचे फोटो दाखवले आहेत, ज्यात प्रदूषणातील फरक स्पष्टपणे दिसत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर,  दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) येत्या काही दिवसांत आणखी गंभीर श्रेणीत येईल.

प्रदूषणापासून मुक्ती कधी मिळणार?येत्या काही दिवसांत उत्तर भारतातील लोकांना प्रदूषणापासून दिलासा मिळू शकतो. दिल्ली NCR मध्ये खूप हलका पाऊस किंवा रिमझिम पाऊस पडू शकतो. याशिवाय, वाऱ्याच्या दिशेवरही खूप काही अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत वाऱ्याची दिशा बदलू शकते, ज्यामुळे उत्तर भारतीयांना या प्रदूषणापासून सुटका होईल. 

टॅग्स :pollutionप्रदूषणdelhiदिल्लीIndiaभारतNASAनासा