शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
2
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
3
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
4
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
5
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
6
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
7
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
8
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
9
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
10
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
11
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
12
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
13
‘सैयारा’- एक अख्खी पिढी इतकी पागल का झाली आहे?
14
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
15
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
16
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
17
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
19
अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेचा मुंबईकरांना भुर्दंड का?  मुंबई महानगरपालिकेवर उच्च न्यायालयाचे ताशेरे
20
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  

"आमदार-खासदार-नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी", AAP नेत्याची BJP वर बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2024 20:10 IST

Delhi Politics : आप खासदार संजय सिंह यांनी भाजपवर दिल्लीत ऑपरेशन लोटस चालवलण्याचा आरोप केला आहे.

Delhi Politics : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहेत. समोरच्या पक्षातील आमदार, नगरसेवकाला आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे. यामध्ये भाजप वरचड होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपने आम आदमी पक्षाच्या पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हा 'आप'साठी मोठा धक्का होता. मात्र या पाचपैकी एक नगरसेवक पुन्हा स्वगृही परतला आहे. दरम्यान, आता आपने भाजपवर घोडेबाजार केल्याचा आरोप केला आहे. 

पक्षाचे नगरसेवक भाजपमध्ये गेल्यामुळे आपने भाजपवर ऑपरेशन लोटस चालवल्याचा आरोप केला आहे. आपचे खासदार संजय सिंह म्हणाले की, आमचे निवडणूक चिन्ह झाडू आहे. ज्यांच्या मनात सत्तेची नशा आहे, त्यांना झाडू मारुन दिल्लीची जनता दुरुस्त करेल. झारखंड, महाराष्ट्र, कर्नाटक, अरुणाचल आणि उत्तराखंडमध्ये भाजपने जो फॉर्म्युला वापरुन सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, तो फॉर्म्युला इथे यशस्वी होणार नाही. 

संजय सिंह यांना विचारण्यात आले की, आम आदमी पक्षातील आणखी आमदार आणि नगरसेवक भाजपमध्ये सामील होण्याची भीती आहे का? त्यावर ते म्हणाले, त्यांच्याकडे दुसरे काही आहे का? जनतेने त्यांना नाकारले आहे, म्हणूनच आता ते ईडी-सीबीआयचा वापर करत आहेत. भाजप हतबल झालेला पक्ष आहे. ही तर आमदार, खासदार आणि नगरसेवकांचे अपहरण करणारी टोळी आहे, अशी बोचरी टीकाही संजय सिंह यांनी यावेळी केली. 

भाजपचा पलटवारदरम्यान, आम आदमी पार्टीच्या या आरोपांवर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, आम आदमी पार्टीच हतबल आहे आणि त्यामुळेच ते अशी विधाने करत आहे. जामिनावर सुटलेल्या संजय सिंह यांच्यामुळे त्रासलेले नगरसेवक भाजपमध्ये येत आहेत आणि आपवाले याला अपहरण म्हणतात. मुख्यमंत्री तुरुंगात आहेत, उपमुख्यमंत्री जामिनावर आहेत, संजय सिंग स्वत: जामिनावर आहेत आणि अशी भाषा वापरत आहेत. येणाऱ्या काळात जनता त्याला योग्य प्रतिसाद देईल, अशी टीका सचदेवा यांनी केली.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागIncome Taxइन्कम टॅक्सArvind Kejriwalअरविंद केजरीवालManish Sisodiaमनीष सिसोदियाNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्ली