दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 12:39 IST2025-09-10T12:38:27+5:302025-09-10T12:39:10+5:30

दिल्ली पोलिसांनी देशभरात मोठी कारवाई करत आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या ९ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

Delhi Police's major operation, 9 suspected ISIS terrorists arrested from across the country! | दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!

दिल्लीपोलिसांनी देशभरात मोठी कारवाई करत आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. त्यानंतर देशभरात १२ पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी करत त्याच्या आणखी आठ साथीदारांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत दिल्लीपोलिसांसोबत केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यांच्या दहशतवादविरोधी पथकांनीही भाग घेतला.

मुख्य आरोपी मुंबईचा

या प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब हा मुंबईचा रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने त्याची ओळख पटवल्यानंतर ही कारवाई सुरू केली. या छापेमारीत मुंबई, रांची आणि इतर अनेक शहरांमधून आठ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रांचीमधून एकाची अटक

झारखंडची राजधानी रांचीमधूनही एका संशयित दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव असहर दानिश असून, तो बोकारो जिल्ह्यातील पेटवार येथील रहिवासी आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने झारखंड एटीएस आणि रांची पोलिसांच्या मदतीने रांचीच्या लोअर बाजार परिसरातील इस्लाम नगरमधून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अनेक आक्षेपार्ह वस्तू आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

सध्या सर्व संशयितांची चौकशी सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या कारवाईतून आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Web Title: Delhi Police's major operation, 9 suspected ISIS terrorists arrested from across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.