शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 17:06 IST

Revanth Reddy Summoned by Delhi Police: दिल्ली पोलिसांनी CM रेवंथ रेड्डींना समन्स का बजावले, वाचा सविस्तर

Revanth Reddy Summoned by Delhi Police: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बनावट व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी दिल्लीपोलिसांनी FIR नोंदवला आहे. दिल्लीपोलिसांनी याप्रकरणी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना नोटीस बजावली आहे. सोमवारी (29 एप्रिल) पोलिसांनी अमित शाह यांचा बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याप्रकरणी रेड्डी यांना नोटीस बजावली आणि 1 मे रोजी त्यांची बाजू मांडण्यास सांगितले. दिल्ली पोलिसांनी जारी केलेल्या नोटीसमध्ये, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्लीला चौकशीसाठी बोलावले असून त्यांचा फोनही सोबत घेऊन येण्यास सांगितले आहे.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेड्डी यांच्या फोनची तपासणी केली जाणार आहे. रेवंत रेड्डी यांनी अमित शाह यांचा फेक व्हिडीओ त्यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला होता. हा व्हिडिओ तेलंगणा काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटसह पक्षाच्या अनेक नेत्यांनीही रिशेअर केला. त्यानंतर तो बराच व्हायरल झाला. त्यानंतर भाजपाकडून रेड्डी आणि काँग्रेसवर बरीच टीका झाली.

एडिटेड व्हिडिओमध्ये केंद्रीय गृहमंत्री SC-ST आणि OBC समाजाचे आरक्षण रद्द करण्याबाबत बोलताना दिसत होते. पण PTI च्या फॅक्ट चेकमध्ये मात्र, अमित शाह यांनी कर्नाटकातील मुस्लिमांना दिलेले आरक्षण संपवण्याबाबत बोलल्याचा तो व्हिडीओ असल्याचे समोर आले. त्यानंतर भाजपाने रेवंथ रेड्डी आणि त्यांच्यासारख्याच इतर पोस्ट शेअर करणाऱ्यांवर टीका केली.

रविवारी (२८ एप्रिल) दिल्ली पोलिसांनी अमित शाह यांचा ए़डिटेड व्हिडिओ पोस्ट करून व्हायरल केल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली. भाजप आणि गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनीही इशारा दिला होता की, हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाई होईल.

पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरमध्ये अमित शाह यांचा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भादंविच्या कलम १५३/१५३ए/४६५/४६९/१७१जी आणि आयटी कायद्याच्या कलम ६६सी अंतर्गत FIR नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :TelanganaतेलंगणाChief Ministerमुख्यमंत्रीAmit Shahअमित शाहdelhiदिल्लीPoliceपोलिस