शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींच्या रॅलीतलं ट्रॅक्टर दिल्लीत आणण्यासाठी चक्क खासदाराच्या पत्राचा वापर; पोलिसांना मिळाली महत्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 09:02 IST

कोरोना काळ आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन, या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतानाही हाय सिक्योरिटी झोनमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आधीच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ संसद मार्गावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात (Rahul Gandhi Tractor Rally) दिल्ली पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, हे ट्रॅक्टर कंटेनरमधून रॅलीसाठी दिल्लीत आणण्यात आले आणि याकरता एका खासदाराच्या पत्राचा वापर करण्यात आला. 

कोरोना काळ आणि संसदेचे पावसाळी अधिवेशन, या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध असतानाही हाय सिक्योरिटी झोनमध्ये ट्रॅक्टर घेऊन जाण्यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी आधीच विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलिसांना ट्रॅक्टर आणि कंटेनरच्या मालखाची ओळख पटली आहे आणि त्यांना चोकशीसाठी नोटीसही पाठवण्यात येणार आहे.

Farm Laws: कृषी कायदे मागे घ्या; राहुल गांधीची मागणी, ट्रॅक्टर चालवत संसदेत एन्ट्री

काय लिहिले होते खासदाराच्या पत्रात -दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंटेनरमध्ये घरगुती सामान आहे, असे खासदाराच्या पत्रात लिहिलेले होते. मात्र, त्यात ट्रॅक्टर आणण्यात आले. या दोन्ही वाहनांचे माल सोनीपत येथील आहेत. ट्रॅक्टरचा माल सोनिपतमधील बिंदरौली येथील आहे. तर कंटेनरचा मालक सोनीपतमधील बाडखालसा भागातील असल्याचे समजते.

दिल्ली पोलिसांत राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी संसदेत ट्रॅक्टर रॅली काढली होती. यावरून आता दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींसह काही काँग्रेस नेत्यांवर भा.दं.वि. कलम 188 आणि महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी हे ट्रॅक्टरही जप्त केले आहे. 

"रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती" -दिल्ली पोलिसांनी सांगितल्यानुसार, काँग्रेसकडून या ट्रॅक्टर रॅलीसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, या ट्रॅक्टरच्या पुढे-मागे नंबर प्लेटही नव्हती. तसेच नवी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर चालविण्यास बंदी आहे. त्यामुळे काँग्रेसने जाहिररित्या मोटार अॅक्टचे उल्लंघन केले आहे, असेही दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनcongressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपPoliceपोलिस