...म्हणून दिशा रवीने ग्रेटा थनबर्गला 'ते' ट्वीट डिलीट करायला सांगितलं?; पोलिसांचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:13 AM2021-02-16T10:13:30+5:302021-02-16T10:18:02+5:30

Toolkit Case Disha Ravi And Greta Thunberg : टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आता तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे.

delhi police said disha ravi asked greta thunberg to delete toolkit tweet on fearing uapa | ...म्हणून दिशा रवीने ग्रेटा थनबर्गला 'ते' ट्वीट डिलीट करायला सांगितलं?; पोलिसांचा मोठा खुलासा

...म्हणून दिशा रवीने ग्रेटा थनबर्गला 'ते' ट्वीट डिलीट करायला सांगितलं?; पोलिसांचा मोठा खुलासा

Next

नवी दिल्ली - पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवी (Disha Ravi) या तरुणीला अटक करण्यात आली आहे. टूलकिट प्रकरणी दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी आता तपासादरम्यान नवनवीन माहिती समोर येत आहे. दिल्ली पोलिसांनी सोमवारी एक मोठा दावा केला आहे. पोलिसांनी दिशा रवीच्या सांगण्यावरूनच ग्रेटा थनबर्गने (Greta Thunberg)ट्विटरवरून आपलं ट्वीट हटवलं होते. एवढचं नाही तर ग्रेटाचे संपादित ट्वीटही दिशा रवीनेच एडीट केलं होतं असं  म्हटलं आहे. तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यामुळे दिशा रवीने ग्रेटाला आपलं ट्वीट हटवण्यास सांगितलं होतं. कारण त्यातील दस्तावेजात दिशाचंही नाव असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. 

ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत एक ट्वीट केलं होतं. या ट्वीट सोबत तिने टूलकिटही ( दस्तावेज ) शेअर केलं. यावरून मोठा वाद झाल्यानंतर तिने हे ट्वीट हटवले. काही वेळानंतर तिने त्याच टूलकिटची (दस्तऐवज) संपादित आवृत्ती ट्वीट केली. आधीची टूलकिट जुनी आहे. यामुळे ती हटविली गेली आहे असं तिने म्हटलं. ग्रेटा थनबर्गने दिशा रवीच्या विनंतीवरून आपलं ट्वीट हटवलं होतं आणि नंतर दस्तऐवजाची संपादित आवृत्ती शेअर केली होती, जी स्वतः दिशाने संपादित केली होती असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशाने Whatsapp वरून ग्रेटा थनबर्गला मेसेज केला होता "ठीक आहे, टूलकिट पूर्णपणे ट्विट न करणं शक्य आहे का? आपण थोडा वेळ थांबू शकतो का? मी वकिलांशी बोलणार आहे. मी दिलगीर आहे, परंतु आमची त्यावर नावे आहेत आणि युएपीए अंतर्गत आमच्यावर कारवाई केली जाऊ शकते" असं म्हटलं आहे. यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई होण्याच्या भीतीने दिशाने ग्रेटाला हे सांगितलं होतं, असा दावा आता पोलिसांनी केला आहे. तसेच हे एक गतिशील दस्तावेज आहे. ज्यात मोठ्या प्रमाणावर हायपरलिंक्स, विविध Google ड्राइव्ह, गुगल डॉक्स आणि वेबसाईट्सच्या लिंक आहेत. यात एक 'आस्क इंडियावॉय.कॉम'. या वेबसाईटचाही समावेश आहे. वेबसाईटमध्ये खालिस्तानी समर्थक बाबी आहेत. म्हणूनच हा दस्तावेज एक मोठी कृती योजना आहे, अशी माहिती दिली पोलिसांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालेली दिशा रवी नेमकी आहे कोण?

दिशा रवी 22 वर्षांची आहे. बंगळुरूतल्या माऊंट कॅर्मेल महाविद्यालयातून तिनं पदवी घेतली आहे. हवामान विषयावर काम करणाऱ्या 'फ्रायडे फॉर फ्युचर' संस्थेत दिशाचा सहभाग आहे. या संस्थेची स्थापना ग्रेटा थनबर्गनं 2018 मध्ये केली. या संस्थेची भारतीय शाखा दिशानं 2019 मध्ये सुरू केली. या शाखेचं नेतृत्त्व दिशा करते. हवामान बदलासंदर्भात दिशानं देशभरात अनेक उपक्रम राबवले आहेत. हवामान बदलाविषयी दिशानं बंगळुरूत अनेक आंदोलनं केली आहेत. हवामान बदलाचे पर्यावरणावर होणारे प्रतिकूल परिणाम याबद्दल दिशानं जगभरातील अनेक माध्यमांमध्ये लिखाण केलं आहे.

...अन् दिशा रवीची थेट अजमल कसाबसोबत तुलना, भाजपा नेत्याचं 'ते' ट्विट जोरदार व्हायरल

भाजपाच्या एका नेत्याचं ट्विट जोरदार व्हायरल झालं आहे. ट्विटमध्ये नेत्याने अजमल कसाब सोबत दिशा रवीची तुलना केली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेता आणि बंगळुरू सेंट्रलचे खासदार पीसी मोहन (PC Mohan) यांनी दिशा रवीची तुलना थेट 26/11च्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब आणि बुरहान वानीसोबत केली आहे. पीसी मोहन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे, "बुरहान वानीदेखील 21 वर्षाचा होता. अजमल कसाबही 21 वर्षाचा होता. वय ही फक्त एक संख्या आहे. कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही. कायद्याला आपलं काम करू द्या. गुन्हा हा नेहमी गुन्हाच असतो" असं मोहन यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्या या ट्वीटमध्ये त्यांनी #DishaRavi असं देखील लिहिलं असून दिशा रविचा एक फोटोही ट्वीट केला आहे. भाजपा नेत्याच्या या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. 

Web Title: delhi police said disha ravi asked greta thunberg to delete toolkit tweet on fearing uapa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.