शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 17:52 IST

Toolkit: दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे.

ठळक मुद्देटूलकिट प्रकरणी राजकारण तापण्याची चिन्हेदिल्ली पोलिसांच्या काँग्रेस नेत्यांना नोटिसा

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून टूलकिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सोमवारी रात्री दिल्लीपोलिसांचे विशेष कक्षाचे पथक ट्विटरच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. (delhi police issues notice to two congress leaders in toolkit case) 

दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास कक्षाने काँग्रेस नेते राजीव गौडा आणि रोहन गुप्ता यांना नोटीस बजावली असून, टूलकिट प्रकरणी या दोघांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी संबित पात्रा यांच्या ट्विटविरोधात तक्रार दिली होती. आमच्या तक्रारीवरून छत्तीसगडमध्येही खटला दाखल करण्यात आला आहे. आम्ही दिल्ली पोलिसांच्या नोटिसीला उत्तर दिले. आम्ही तिथे या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असे राजीव गौडा यांनी म्हटले आहे. 

मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज

मॅनिपुलेटेड टॅग देणार्‍याचा शोध

दिल्ली पोलीस संबित पात्रा यांच्या ट्विटवर सेल ट्विटर मॅनिपुलेटेड टॅग देणार्‍याचा शोध घेत आहेत. सेल-अधिकारीही सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये असलेल्या ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचले होते. काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते.

आता जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणासाठी RBI ची परवानगी अनिवार्य; गाइडलाइन्स जारी

माजी मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवणार!

रायपूर पोलिसांनी टूलकिटप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपकडून करण्यात आलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले असून, संबित पात्रा आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.   

टॅग्स :Toolkit Controversyटूलकिट वादdelhiदिल्लीPoliceपोलिसcongressकाँग्रेसTwitterट्विटर