शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महुआ मोईत्रांच्या अडचणीत वाढ! दिल्ली पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 19:47 IST

Mahua Moitra : महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती.

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे. बीएनएसच्या कलम ७९ अंतर्गत, म्हणजेच महिलेच्या प्रतिष्ठेचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडिया साइटवर एका पोस्टमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी महिला आयोगाने शुक्रवारी (५ जुलै) दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी (७ जुलै) गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे इंटेलिजेंस फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स (IFSO) युनिट आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स हँडलवरून माहिती घेईल, ज्यावरून रेखा शर्मा यांच्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले होते.

काय आहे प्रकरण?उत्तर प्रदेशातील हाथरस येथे २ जुलै रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा ३ जुलै रोजी घटनास्थळी गेल्या होत्या. या विषयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला. त्यात एक व्यक्ती रेखा शर्मा यांच्या डोक्यावर छत्री धरुन उभा होता. तो व्हिडिओवर सोशल मीडियावर पाहिल्यानंतर रेखा शर्मा यांना छत्री सुद्धा हातात धरता येत नाही का? असा सवाल एका युजर्सने केला होता. त्यावर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीही अभ्रद टिप्पणी दिली.

काय म्हणाल्या होत्या महुआ मोईत्रा?तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा म्हणाल्या की, त्या (रेखा शर्मा) आपल्या बॉसचा पायजमा पकडण्यात गुंतलेल्या आहेत, अशी टिप्पणी केली. त्यानंतर वाद उफळला. ही टिप्पणी अत्यंत अपमानजनक असल्याचे सांगत राष्ट्रीय महिला आयोगाने दिल्ली पोलिसांत तक्रार दिली. तसेच, महुआ मोईत्रा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आले. 

टॅग्स :Mahua Moitraमहुआ मोईत्राTrinamool Congressतृणमूल काँग्रेसCrime Newsगुन्हेगारी