शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
4
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
5
छत्तीसगच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
6
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
7
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
8
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
9
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
10
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
11
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
12
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
13
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
14
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
15
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
16
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
17
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
18
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
19
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
20
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."

टॉवेल सुटला अन् चोर सापडला; धम्माल थरार सीसीटीव्हीने टिपला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 12:27 PM

दिल्लीत पोलिसांनी एका चोराला अजब स्थितीत पकडलं

नवी दिल्ली: पोलिसांकडून चोरांचा केला जाणारा पाठलाग काही नवा नाही. मात्र दिल्लीत पोलिसांनी एका चोराला अजब स्थितीत पकडलं आहे. पोलिसांनी पाहताच नेहमीच चोर पळू लागतात. तसंच इथंही घडलं. पोलिसांना चकवण्यासाठी चोरानं थेट दुसऱ्या मजल्यावरुन उडीदेखील मारली. मात्र तितक्यात त्यानं कमरेभोवती गुंडाळलेलं टॉवेल सुटलं आणि चोर पोलिसांच्या हाती लागला. पश्चिम दिल्लीच्या इंद्रपुरीमध्ये पोलिसांनी चोराला अटक केली आहे. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानं पोलिसांवर टीका होत होती. पोलिसांनी आरोपीला निर्वस्त्र करुन त्याला बाजारात पळवलं, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. यावर दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी दीपेंद्र पाठक यांनी स्पष्टीकरण दिलं. 'पोलीस चोराला पकडण्यासाठी गेले असता, त्यानं तिथून पळ काढला. दुसऱ्या मजल्यावर उडी मारताना त्याचं टॉवेल सुटलं. त्याही परिस्थितीत तो पळण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडलं,' असं पाठक यांनी सांगितलं. निर्वस्त्र अवस्थेत धावणाऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडलं आणि त्याला पोलिसांच्या गाडीत नेलं. त्यानंतर त्याला कपडे देण्यात आले. अटक करण्यात आलेला अतिशय कुख्यात असून त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटदेखील जारी करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव विरेंद्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी गेले होते. त्यावेळी तो बाथरुममध्ये जाऊन लपला. यानंतर तो तिथूनही बाहेर पडला आणि त्यानं दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. मात्र त्याचं टॉवेल सुटलं आणि तो निर्वस्त्र झाला. त्यामुळे चोर फार वेळ पळू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.  

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोरtheftचोरी