"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 09:21 PM2020-12-02T21:21:45+5:302020-12-02T21:21:52+5:30

Farmer Protest : . दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे

"Delhi is not Lahore-Karachi; Water, road closures are not appropriate '', appeals to agitating farmers | "दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

"दिल्ली म्हणजे लाहोर-कराची नाही; पाणी, रस्ते बंद करणे योग्य नाही’’, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन

Next

चंदिगड - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हरयाणा सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन थांबवून मध्यममार्ग काढावा. त्यामुळे दिल्लीच्या नागरिकांना त्रास होणार नाही. शेतकऱ्यांनी सदसदविवेकबुद्धीने विचार करावा, असे आवाहन हरयाणाचे कृषिमंत्री जे.पी. दलाल यांनी केले आहे.

जे. पी. दलाल यांनी सांगितले की, मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की, त्यांनी सदबुद्धीने विचार करावा. चर्चा करावी. दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे.

दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही शेतकऱ्यांना आवाहान केले होते. ते म्हणाले होते की, हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. तसेच दीर्घकाळानंतर त्यामध्ये सुधारणा केल्या जात आहेत. मात्र जर त्यांना त्यामध्ये काही अडचणी जाणवत असतील तर आम्ही त्यांच्या चिंतांबाबत चर्चा करण्यास तयार आहोत. आम्ही उद्या शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत. तसेच कुठपर्यंत तोडगा निघेल याची चाचपणी करणार आहोत.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आता ट्रक ऑपरेटर्सचाही पाठिंबा मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याची घोषणा केली आहे.

सरकारसोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी शेतकऱ्यांकडून मात्र आंदोलन सुरू आहे. चिल्ला बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आपल्याशी चर्चा करावी, असा आग्रह धरला आहे. दरम्यान, शेतकरी आणि केंद्र सरकारमधील काल झालेली बैठक अनिर्णित राहिली आहे.

एआयएमटीसी गुड्स व्हेईकल ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व करते. याअंतर्गत सुमारे दहा मिलियन म्हणजेच १ कोटी ट्रकर्स येतात. देशात सामान एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यामध्ये यांचे मोठे योगदान असते. आता आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ८ डिसेंबरपासून संप पुकारण्याच येणार असल्याचा इशारा एआयएमटीसीने दिला आहे.

Web Title: "Delhi is not Lahore-Karachi; Water, road closures are not appropriate '', appeals to agitating farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.