शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
4
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
5
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
6
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
7
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
8
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
9
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
10
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
11
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
12
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
13
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
14
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
15
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
16
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
17
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
18
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
19
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
20
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 

'मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हे जनरल डायर बनलेत', आप नेत्याचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 1:11 PM

Aam Aadmi Party leader Raghav Chadha : आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

ठळक मुद्देकेंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे.शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणामधीलशेतकरी दिल्लीच्या सीमेवर बऱ्याच दिवसांपासून आंदोलन करत आहेत. या आंदोलनदरम्यान पाऊस आणि कडाक्याच्या थंडीतही शेतकरी रस्त्यावर आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्डा यांनी एक मोठे विधान केले आहे. त्यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची तुलना जनरल डायर यांच्याशी केली आहे.

वृत्तसंस्था एएनआयशी राघव चड्डा यांनी बातचीत केली. यावेळी मनोहर लाल खट्टर यांनी जनरल डायर यांच्यासारखे आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्याचे आणि गोळीबार करण्याचे आदेश दिले आहेत, असे राघव चड्डा म्हणाले. तसेच, देशातील शेतकरी आपले शत्रू आहेत का? ते चीन किंवा पाकिस्तान लष्कराचे जवान आहेत का? त्याच्याशी असे का वागले जात आहे? असे सवाल राघव चड्डा यांनी केले आहेत.

नवीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन हळूहळू तीव्र होत आहे. रविवारी शेतकऱ्यांनी पोलिसांचे बॅरिकेडिंग तोडून दिल्लीच्या दिशेने पुढे आले. त्यानंतर दिल्ली-जयपूर महामार्गावरील मसानी गावाजवळ पोलीस आणि शेतकर्‍यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकरी पुढे जाण्यावर ठाम होते. त्याचवेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून अश्रुधुराचा वापर केला.

दरम्यान, केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आंदोलन शेतकरी आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीवर आज तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, आजच्या बैठकीतून तोडगा निघेल आणि तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांचे आंदोलन लवकरच संपेल, अशी आशा केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये आतापर्यंत बैठकीच्या सहा फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तीन कृषी कायद्यांबाबत सरकार व शेतकरी यांच्यात सुरू असलेली चर्चा अद्याप संपलेली नाही. सप्टेंबरमध्ये संसदेने मंजूर केलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी शेतकरी संघटना ठाम आहेत. सरकारचे म्हणणे आहे की या कायद्यांमुळे कृषी क्षेत्र सुधारेल आणि शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढेल. नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी आणि मंडई व्यवस्था कमकुवत होईल, अशी भीती शेतकरी संघटनांना वाटत आहे. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीAAPआपHaryanaहरयाणा