शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
2
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
3
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
4
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
5
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
6
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
7
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
8
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
9
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
10
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
11
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
12
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
13
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
14
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
15
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
16
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
17
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
18
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
19
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
20
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा? अशी आहे अंतिम आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 3:40 PM

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली एमसीडी निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दरम्यान, दिल्ली एमसीडीमधील सर्व २५० जागांचे निकाल दुपारी जाहीर झाले आहेत. 

नवी दिल्ली - दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अगदी अटीतटीच्या दिसत असलेल्या या निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दरम्यान, दिल्ली एमसीडीमधील सर्व २५० जागांचे निकाल दुपारी जाहीर झाले आहेत. 

या निकालांनुसार एकूण २५० जागा असलेल्या एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने १०४ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळाला. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यामध्ये केवळ ३ जागा गेल्या.

दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.५ टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली.  मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली.

दिल्ली एमसीडीमध्ये २००७ पासून भाजपाची सत्ता होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८  आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच वॉर्डची संख्या घटून २५० एवढी झाली होती.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस