Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा? अशी आहे अंतिम आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 03:40 PM2022-12-07T15:40:49+5:302022-12-07T15:43:30+5:30

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली एमसीडी निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दरम्यान, दिल्ली एमसीडीमधील सर्व २५० जागांचे निकाल दुपारी जाहीर झाले आहेत. 

Delhi MCD Election Results 2022: Results of all seats of Delhi Municipal Corporation announced, this is the final tally | Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा? अशी आहे अंतिम आकडेवारी

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जाहीर, कोणाला किती जागा? अशी आहे अंतिम आकडेवारी

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीसह संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासून अगदी अटीतटीच्या दिसत असलेल्या या निवडणुकीत मतमोजणीच्या उत्तरार्धात आम आदमी पक्षाने आघाडी मिळवली आणि ती अखेरपर्यंत टिकवली. दरम्यान, दिल्ली एमसीडीमधील सर्व २५० जागांचे निकाल दुपारी जाहीर झाले आहेत. 

या निकालांनुसार एकूण २५० जागा असलेल्या एमसीडीमध्ये आम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाने १०४ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ ९ जागांवर विजय मिळाला. तर अपक्ष आणि इतरांच्या खात्यामध्ये केवळ ३ जागा गेल्या.

दिल्ली एमसीडीच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला ४२.५ टक्के मते मिळाली. तर त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपाला मिळाली.  मात्र एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्णपणे पानीपत झाले नाही एवढीच भाजपासाठी जमेची बाजू ठरली.

दिल्ली एमसीडीमध्ये २००७ पासून भाजपाची सत्ता होती. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८  आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच वॉर्डची संख्या घटून २५० एवढी झाली होती.  

Web Title: Delhi MCD Election Results 2022: Results of all seats of Delhi Municipal Corporation announced, this is the final tally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.