Delhi MCD Election: दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:06 PM2022-12-07T12:06:45+5:302022-12-07T12:09:58+5:30

निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.

Delhi MCD Election: AAP's victory cheers in Delhi, activists unfurl banners of Arvind kejariwal vs bjp like zero | Delhi MCD Election: दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा'

Delhi MCD Election: दिल्लीत 'आप'चा विजयी जल्लोष, कार्यकर्त्यांनी झळकावले बॅनर; 'ओ झिरो हो जाएगा'

googlenewsNext

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत दिल्ली महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली असून आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. सुरुवातीपासूनच आपचे उमेदवार विजयाच्या दिशेने मोठ्या संख्येनं आगेकूच करत आहेत. त्यामुळे, दिल्लीतील आप समर्थकांनाही विजयाचा विश्वास आहे. त्यामुळेच, दिल्लीत आपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या संपूर्ण निकालापूर्वीच बॅनरबाजी केली आहे. कार्यकर्त्यांनी विजयाची अगोदरच तयारी केली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली असून एका आप कार्यकर्त्याच्या हातीतील पोस्टर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

निवडणुकीत आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे.  42 मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी सुरू आहे. एकूण 1,349 उमेदवारांच्या भवितव्याचा काही क्षणात फैसला होणार आहे. याआधी सर्व एक्झिट पोलच्या अंदाजात आपचे सरकार होणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही जनतेचे अभिनंदन केले आहे. एमसीडीमध्ये गेल्या दीड दशकांपासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या भवितव्याचा फैसलाही काही वेळात होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच आपकडून विजयी जल्लोष साजरा होताना दिसून येत आहे. 

'केजरीवाल से जो टकराएगा, वो जीरो हो जाएगा।' या आशयाचे दिल्लीतील पोस्टर सध्या व्हायरल झाले आहे. पोस्टरमध्ये पुढे लिहिण्यात आले की, केजरीवाल यांच्याशी वीज, पाणी, बस तिकीट आणि काँग्रेसने धडक दिली, ते सर्व झिरो झाले आहेत. आता, भाजपची बारी आहे. सध्या हे पोस्टर दिल्लीतील निकालानंतर लक्षवेधी ठरत आहे. 

स्पष्ट बहुमतासाठी 129 जागांची गरज

दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला बहुमत मिळत आहे. सर्व 250 जागांचे कल आणि निकाल जाहीर झाले आहेत. आप 129 जागांवर आघाडीवर आहे तर भाजप 106 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 10 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता आप सत्तेत येणार असल्याचे निश्चित झाले आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला बहुमतासाठी किमान 126 जागा जिंकाव्या लागतील, MCD मध्ये एकूण 250 जागा आहेत.

Web Title: Delhi MCD Election: AAP's victory cheers in Delhi, activists unfurl banners of Arvind kejariwal vs bjp like zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.