शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

National Herald Case : काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 14:31 IST

खालच्या न्यायालयाने स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. (Delhi high court)

ठळक मुद्देनॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे.सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतरही काही मंडळींना नोटीस.सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

 नवी दिल्ली - नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald Case) दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. याच बरोबर न्यायालयाने सोमवारी आरोपी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी Sonia Gandhi) आणि काँग्रेस नेते राहुल गांधी तथा इतर काही मंडळींना नोटीस बजावत, भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी (Subramanian Swamy) यांच्या याचिकेसंदर्भात उत्तरही मागितले आहे. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (Delhi high court issues notice to sonia gandhi rahul gandhi in national herald case over bjp mp subramanian swamy plea)

काँग्रेसच्या हाती आला मोठ्ठा भोपळा; मोदी-शहांचा आणखी एक जोरदार दणका

सोनिया गांधी तथा इतरांवर खटला चालवण्यास दिला होता नकार -खालच्या न्यायालयाने स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. आता न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांदी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ‘यंग इंडिया’ (वायआय) यांच्या कडून 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.

मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप -भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वतीने वकील सत्या सभरवाल आणि गांधी कुटुंब तथा इतरांकडून वकील तरन्नुम चीमा यांनी, उच्च न्यायालयाने नोटीस जारी केल्यासंदर्भात आणि 12 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित केल्यासंदर्भात पुष्टी केली आहे. स्वामी यांनी खालच्या न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतरही काही लोकांवर फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप केला होता.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीSubramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीBJPभाजपाcongressकाँग्रेसHigh Courtउच्च न्यायालय