शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

बाबा रामदेवांना धक्का! अडचण वाढली; 'त्या' एका वक्तव्यावरून दिल्ली उच्च न्यायालयानं नोटीस धाडली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 3:57 PM

रामदेवांच्या या वक्तव्यावर डॉक्टरांच्या एका संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही, रामदेवांचे हे वक्तव्य "अत्यंत दुर्दैवी" असल्याचे म्हणत, ते वापस घ्यायला सांगितले होते. (Delhi high court issued notice on swami ramdev statement)

नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग गुरू स्वामी रामदेव यांना अ‍ॅलोपॅथीवर केलेल्या वक्तव्यामुळे नोटीस बजावली आहे. स्वामी रामदेव यांनी कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या पद्धतीवरून डॉक्टरांवर टीका केली होती. यामुळे आता उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना अ‍ॅलोपॅथी आणि अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांविरोधात "चुकीची माहिती पसरवल्या"बद्दल  नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 10 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे. (Delhi high court issued notice on swami ramdev statement lakhs died due to allopathy medicine)

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या तक्रारीनंतर पाटणा आणि जयपूर येथे स्वामी रामदेवांविरोधात अनेक एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत.

यानंतर, आपल्या वक्तव्याचा एक व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वामी रामदेव यांनी आपले वक्तव्य मागे घेतले होते. या व्हिडिओमध्ये त्यांनी कोरोना व्हायरस संक्रमणावरीर उपचारात वापरल्या जाणाऱ्या काही औषधांवर प्रश्न उपस्थित केल्याचे दिसत आहे. या व्हिडिओत बाबा रामदेव, "कोविड-19 साठी अ‍ॅलोपॅथिक औषधी घेतल्यानंतर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे," असे म्हणताना ऐकू येत आहे.

पतंजलीच्या आयपीओबाबत बाबा रामदेव यांनी केली मोठी घोषणा, गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता

रामदेवांच्या या वक्तव्यावर डॉक्टरांच्या एका संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे. एवढेच नाही, तर तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनीही, रामदेवांचे हे वक्तव्य "अत्यंत दुर्दैवी" असल्याचे म्हणत, ते वापस घ्यायला सांगितले होते. 

आयएमएची नोटीस -तत्पूर्वी, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) उत्तराखंडने मे महिन्यात बाबा रामदेव यांना 1000 कोटी रुपयांची मानहानी नोटीस पाठविली होती. यात, बाबा रामदेव यांनी 15 दिवसांच्या आत खंडन व्हिडिओ आणि लेखी स्वरुपात माफी मागितली नाही, तर त्यांच्याकडे 1000 कोटी रुपयांची मागणी केली जाईल. याच बरोबर रामदेव यांना 72 तासांच्या आत कोरोनिल किटची दिशाभूल करणारी जाहिरातही सर्व ठिकाणांहून हटविण्यास सांगण्यात आले होते. कोरोनिल कोविड व्हॅक्सीननंतर होणाऱ्या साइड इफेक्ट्सवर प्रभावी असल्याचा दावा, या जाहिरातीत करण्यात आला होता.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाCourtन्यायालयdelhiदिल्लीcorona virusकोरोना वायरस बातम्या