शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

स्मृती इराणी यांच्या मुलीला दिल्ली हायकोर्टाने दिली क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2022 19:22 IST

Smriti Irani : या प्रकरणाची शुक्रवारी (29 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्याचा तपशीलवार आदेश आता समोर आला आहे.

गोव्यातील रेस्टॉरंटच्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीउच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि त्यांची मुलगी (जोईश इराणी) त्या रेस्टॉरंटच्या मालक नाहीत, असे दिल्लीउच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच त्या रेस्टॉरंटच्या संबंधात त्याने कधीही परवान्यासाठी अर्ज केला नाही. या प्रकरणाची शुक्रवारी (29 जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्याचा तपशीलवार आदेश आता समोर आला आहे.न्या.मिनी पुष्कर्ण यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही टिप्पणी केली. त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स पाठवले आहे. स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर हे समन्स पाठवण्यात आले आहे. इराणी यांनी या नेत्यांना 2 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने काँग्रेस नेते पवन खेरा यांनी स्मृती इराणी यांच्या मुलीशी संबंधित ट्विट तात्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले होते. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले आहे की, गोव्यातील ते रेस्टॉरंट किंवा त्याची जमीन स्मृती इराणी किंवा त्यांच्या मुलीची नाही.न्यायालयाने पुढे म्हटले की, बचाव पक्षाच्या लोकांनी (तीन काँग्रेस नेते) आणि इतर काही लोकांनी खोट्या गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्यांनी स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीवर वैयक्तिक टप्पणीही केली. असे करून स्मृती इराणी यांची प्रतिमा मलिन करण्याचे काम केल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने मान्य केले. दिल्ली उच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, वास्तविक तथ्य जाणून न घेता मोठे आरोप केले गेले, ज्यामुळे स्मृती इराणी आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा खराब झाली.स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेते जयराम नरेश, पवन खेरा आणि नेट्टा डिसोझा यांना समन्स बजावले असून पुढील सुनावणीत उत्तरासह हजर राहण्यास सांगितले आहे. दिवाणी खटला असल्याने मानहानीचे समन्सही बजावण्यात आले आहेत. आता पुढील सुनावणी 18 ऑगस्टला होणार आहे.हे प्रकरण गोव्यातील सिली सॉल्स कॅफे आणि बारशी संबंधित आहे. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी आरोप केला होता की, स्मृती इराणी यांच्या मुलीने गोव्यात रेस्टॉरंट चालवत 13 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट परवाना घेतला होता.

 

 

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीdelhiदिल्लीHigh Courtउच्च न्यायालयgoaगोवाhotelहॉटेलcongressकाँग्रेस