शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

याला म्हणतात 'हटके लग्न'! पुढे-मागे पोलीस अन् मधे 'नवरदेव-नवरी', अशी करण्यात आली पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 17:53 IST

नवी दिल्ली : आपले लग्न जरा हटके व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, लॉकडाउनमुळे अशांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी लग्न ...

ठळक मुद्देया लग्नाला केवळ दोनच पाहुणे उपस्थित होते आणि ते म्हणजे दोन पोलीसमुलीची पाठवणीही पोलिसांनी त्यांच्याच जिप्सीतून केली.पोलिसांच्या परवानगीनंतर पार पडला विवाह

नवी दिल्ली : आपले लग्न जरा हटके व्हावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र, लॉकडाउनमुळे अशांच्या अडचणी वाढल्या आहेत. अनेकांनी लग्न समारंभ पुढे ढकलले आहेत. तर अनेक जण लॉकडाउनमध्येच लग्न करत आहेत. मात्र, या काळातही जे लग्न करत आहेत. त्यांच्यासाठी हे लग्न जरा हटकेच म्हणावे लागेल. दिल्लीमध्येही एक असेच लग्न पार पडले. या लग्नाला पुढे आणि मागे पोलीस, तर मधे नवरदेव-नवरी होते. अर्थात या लग्नाला केवळ दोनच पाहुणे उपस्थित होते आणि ते म्हणजे दोन पोलीस. विशेष म्हणजे मुलीची पाठवणीही पोलिसांनी त्यांच्याच जिप्सीतून केली.

दिल्ली येथील गोविंदपुरीतील 27 वर्षीय कुशल वालिया याने शनिवारी पूजा नावाच्या मुलीशी लग्नगाठ बांधली. या लग्नाला घरच्यांच्या शिवाय केवळ दोन पोलीसच होते. या जोडप्याला तेच येथील कालकाजी येथील आर्य समाजाच्या मंदिरात घेऊन गेले. विशेष म्हणजे यांना पोलीस ठाण्यातूनच नेण्यात आले.

सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा झटका! महागाई भत्ता गोठवल्यानंतर, आता 'या' भत्त्याला लागू शकते कात्री

स्वतःच केला मेकअप अन् आईचीच नेसली साडी -लग्नामध्ये आपण सुंदर दिसावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. मात्र, लॉकडाउनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे पूजाने स्वत:च आपल्या मेकअप करून घेतला आणि आईची साडी नेसून लग्न केले. यावेळी कुशल आणि पूजासह तेथील मंडळींनीही मास्कचा वापर केला होता. लग्नानंतर पोलिसांनीच आपल्या जिप्सीतून कुशल आणि पूजाला घरी सोडले. 

यासंदर्भात बोलताना कुशल म्हणाला, 'माझ्या वडिलांनी लग्नापूर्वी पोलिसांची परवानगी घेतली. तसेच लग्नात आई वडिलां शिवाय इतर कुणीही उपस्थित राहणार नाही,' असे सांगितले. यानंतर हा विवाह पार पडला. 

किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीIndiaभारतPoliceपोलिस