दिल्ली: भाजी मार्केटमधील पाच मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 01:03 PM2021-09-13T13:03:20+5:302021-09-13T13:03:41+5:30

building collapsed in Delhi: इमारतीखाली अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. इमारत पडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दोन मुले अडकल्याचे देखील सांगितले जात आहे. 

Delhi: Five-storey building collapses in Sabzi Mandi area, several feared trapped | दिल्ली: भाजी मार्केटमधील पाच मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

दिल्ली: भाजी मार्केटमधील पाच मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

Next

उत्तर दिल्लीच्या भाजी मार्केट परिसरात 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. (building collapsed in the Sabzi Mandi area of Delhi on Monday.)

इमारत पडताना पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इमारतीखाली अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. इमारत पडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दोन मुले अडकल्याचे देखील सांगितले जात आहे. 

दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास सब्जी मंडीमधून एक फोन आला होता. यामध्ये इमारत कोसळल्याची सूचना देण्यात आली होती. घटनास्थळी पाच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. रॉबिन सिनेमाजवळील ही इमारत आहे. बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. 

Web Title: Delhi: Five-storey building collapses in Sabzi Mandi area, several feared trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app