Delhi Exit Poll 2020 : दिल्लीच्या मनात केजरीवाल; भाजपाच्या कामगिरीत सुधारणा, महापोलची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 10:26 PM2020-02-08T22:26:25+5:302020-02-08T23:45:07+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान शनिवारी संपल्यानंतर सर्वच 70 जागांवरच्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे.

Delhi Exit Poll 2020 : all exit polls predicts landslide victory aap in delhi assembly elections | Delhi Exit Poll 2020 : दिल्लीच्या मनात केजरीवाल; भाजपाच्या कामगिरीत सुधारणा, महापोलची भविष्यवाणी

Delhi Exit Poll 2020 : दिल्लीच्या मनात केजरीवाल; भाजपाच्या कामगिरीत सुधारणा, महापोलची भविष्यवाणी

Next
ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान शनिवारी संपल्यानंतर सर्वच 70 जागांवरच्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. सर्वच एक्झिट पोलनी आम आदमी पार्टी पुन्हा एकदा बहुमतानं राजधानीत परतणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. 10 प्रमुख एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला सरासरी 52, भाजपाला 17 आणि काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

नवी दिल्लीःदिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान शनिवारी संपल्यानंतर सर्वच 70 जागांवरच्या उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. या निवडणुकीचा 11 फेब्रुवारीला निकाल लागणार असून, सर्वच एक्झिट पोलनी आम आदमी पार्टी पुन्हा एकदा बहुमतानं राजधानीत परतणार असल्याची भविष्यवाणी केली आहे. 10 प्रमुख एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टीला सरासरी 52, भाजपाला 17 आणि काँग्रेसला 1 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल ऑफ पोल्समध्ये भाजपाच्या निवडणूक कामगिरीत सुधारणा झाल्याचं दिसत आहे. परंतु बहुमतासाठी लागणारं 36 आमदारांचं संख्याबळ भाजपाला मिळवणं अवघड आहे. काँग्रेसला यंदा अथक प्रयत्नांनी खातं उघडण्याची शक्यता आहे. काँग्रेसला एका जागेवर विजय मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसला खातंसुद्धा उघडता आलेलं नव्हतं. 

एक्झिट पोलमध्ये दिल्लीतल्या जनतेनं केजरीवालांच्या कामावर विश्वास दाखवल्याचं पाहायला मिळत आहे. पोल ऑफ पोल्सनुसार गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा आपच्या पारड्यात 16 जागा कमी पडू शकतात. गेल्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं 70 पैकी 67 जागा जिंकून इतिहास रचला होता. या निवडणुकीतही आम आदमी पार्टीनं चांगली कामगिरी केल्याचं समोर येतं आहे. इंडिया टुडे- एक्सिसच्या एक्झिट पोलमधून आम आदमी पार्टी यंदाही 59 ते 68 जागा जिंकू शकते.
 
टाइम्स नाऊ, जन की बात, न्यूज एक्स-पोलस्टार्ट आणि इंडिया टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला यंदाही खातं उघडता येणार नसल्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे.  एबीपी न्यूज-सी वोटर काँग्रेसला दोन जागा मिळू शकतात. काँग्रेसला न्यूज एक्स-एनईटीएने 1, इंडिया न्यूज नेशनने 1 आणि सुदर्शन न्यूजने 2 जागा मिळण्याची भविष्यवाणी केली आहे.

पोल ऑफ पोल्स     आप+  भाजपा+काँग्रेस+
टाइम्स नाऊ- IPSOS    47     23                0
रिपब्लिक- जन की बात  55      15 0
इंडिया टीव्ही- IPSOS   44     26 0
न्यूजX- पोलस्ट्रेट    56      14     0
इंडिया टुडे- ऍक्सिस माय इंडिया     63     07  0
न्यूजX-NETA      55   14 1
एबीपी न्यूज- सी व्होटर          56   12  2
इंडिया न्यूज नेशन      5514 1
सुदर्शन न्यूज           42  262
टीव्ही 9 भारतवर्ष     54 151
महापोल   52 17  1   

पोल ऑफ पोल्सनुसार भाजपाच्या कामगिरीत सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत ज्यांनी भाजपाला मतदान केलेलं आहे, त्यांना भाजपा पुन्हा आपल्याकडे वळवू शकलेली नाही. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले होते. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहे. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल काय लागतो हे 11 फेब्रुवारीला मतमोजणीनंतरच समजणार आहे.
 

Web Title: Delhi Exit Poll 2020 : all exit polls predicts landslide victory aap in delhi assembly elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.