Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 13:05 IST2025-01-21T13:04:26+5:302025-01-21T13:05:10+5:30
Delhi Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मोफत शिक्षणासह काही मोठ्या घोषणा केल्या.

Delhi Elections: केजी टू पीजी शिक्षण मोफत, रिक्षा, टॅक्सी चालकांचा १० लाखांचा विमा; भाजपच्या मोठ्या घोषणा
BJP Manifesto: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहिरनाम्याचा दुसरा भाग म्हणजेच संकल्प पत्र पार्ट २ जाहीर केले. अनुराग ठाकूर यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. भाजपच्या संकल्प पत्र १ मध्ये महिलांवर लक्ष्य केंद्रीत केले गेले आहे. तर संकल्प पत्र २ मध्ये इतर काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी संकल्प पत्र २ प्रसिद्ध करताना सांगितले की, गरजू विद्यार्थ्यांसाठी, यूपीएससी आणि राज्य पीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत केली जाईल. गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये अशी मदत केली जात आहे.
भाजपच्या संकल्प पत्र २ मध्ये कोणत्या घोषणा?
आम्ही दिल्लीतील तरुणांसाठी राज्यातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी १५ हजारांची आर्थिक मदत करू, जेणेकरून तरुण चांगला निकाल देऊ शकतील.
दिल्लीतील तंत्रज्ञान, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करेल. भीमराव आंबेडकर यांच्या नावाने ही योजना सुरू केली जाईल. याअंतर्गत आयटीआय आणि कौशल्य विकास केंद्र, पॉलिटेक्निकमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १ हजार रुपये दिले जातील.
रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी भाजप रिक्षा-टॅक्सी कल्याण मंडळ स्थापन करू आणि ते अस्तित्वात आल्यानंतर १० लाखांचा जीवन विमा, तसेच ५ लाखांचा अपघात विमा काढू.
उच्च शिक्षण घेणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाईल. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्यांच्या विम्यामध्येही सरकार आल्यास भाजप सवलत देईल.
दिल्लीत भाजपचं सरकार आल्यानंतर पीएम स्वनिधी योजनेचा ४ फुटपाथ विक्रेत्यांना लाभ दिला जाईल.
दिल्लीत भाजपचं सरकार आल्यास कौशल्य पुनर्विकास आणि कौशल्य वाढवण्याचे काम केले जाईल.