Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 10:05 AM2020-02-11T10:05:16+5:302020-02-11T10:17:19+5:30

Delhi Assembly Election Results Updates: दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे.

Delhi Election Results know connection of arvind kejriwal and valentines day | Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Delhi Election Results : व्हॅलेंटाईन डे अन् केजरीवालांचं नातं खास; याच दिवशी दोनदा घडवला इतिहास

Next
ठळक मुद्देदिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे.सुरुवातीचे कल पाहता आपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली आहे. अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतआपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं असून 53 टक्के मतदान झालं. दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट संकेत एक्झिट पोलमधून मिळाले आहेत. ही निवडणूक आपसाठी अटीतटीची, भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. मतमोजणीला सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल पाहता आपने जोरदार मुसंडी मारत तब्बल 53 जागांवर आघाडी घेतली आहे. 

दिल्ली निवडणूक निकालांमध्ये आपचा विजय झाला तर दिल्लीमध्ये त्यांचं सलग तिसऱ्यांदा सरकार बनणार आहे. तसेच असं झाल्यास दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा व्हॅलेंटाईन डे म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेण्याची शक्यता आहे. आठ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. जवळपास सर्व मतदानोत्तर चाचण्यांतून तिथे पुन्हा आम आदमी पक्षालाच बहुमत मिळेल असे अंदाज वर्तविले आहेत. विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. 

दिल्लीमध्ये जर पुन्हा एकदा आपचं सरकार आलं तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हॅटट्रिक करणार आहेत. तसेच 14 फेब्रुवारी म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' ला केजरीवाल शपथ घेण्याची देखील शक्यता आहे. याआधी 2013 आणि 2015 या दोन्ही वेळेस दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'व्हॅलेंटाईन डे' आणि अरविंद केजरीवाल यांचं अनोखं कनेक्शन राहीलं आहे. मात्र हा फक्त एक योगायोग असू शकतो. 2013 मध्ये 4 डिसेंबर रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पाडलं आणि 8 डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. 

2012 नोव्हेंबरमध्ये आम आदमी पार्टीची स्थापना झाली आणि पहिल्यांदा निवडणूक लढताना या पक्षाने 70 पैकी 28 जागा जिंकल्या. दिल्लीमध्ये भाजपाने 31 आणि काँग्रेसने 8 जागा जिंकल्याने विधानसभा त्रिशंकु राहिली. आपने सरकार स्थापनेसाठी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आणि अरविंद केजरीवाल यांनी 28 डिसेंबर रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि आपचे संबंध बिघडले आणि केजरीवालांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. 14 फेब्रुवारी 2014 रोजी त्यांनी राजीनामा दिला. हे सरकार केवळ 49 दिवस चाललं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

निवडणूक आयोगाने 12 जानेवारी 2015 रोजी दिल्लीत निवडणुकांची घोषणा केली. आपचे प्रवक्ते राघव चड्ढा यांनी त्याच दिवशी 'केजरीवाल ऐतिहासिक रामलीला मैदानातून 14 फेब्रुवारी रोजी शपथ घेतील आणि ते दिल्लीचे व्हॅलेंटाईन बनतील' अशी घोषणा केली होती.  त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी मतदान झालं आणि 10 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. आपने 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या व भाजपाला अवघ्या तीन जागांवर रोखलं. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. नंतर राघव चड्ढा यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे केजरीवालांनी रामलीला मैदानातून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

एका वर्षानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दिवसाचं महत्त्व सांगणारं एक ट्विट केलं होतं. यामध्ये 'गेल्यावर्षी याच दिवशी दिल्लीला आपच्या प्रेमात पडली होती. हे कधीही न संपणारं प्रेम आहे' असं म्हटलं त्यानंतर 2018 मध्ये आप सरकारने 14 फेब्रुवारी रोजी तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजनही केलं होतं. त्यामुळे अरविंद केजरीवाल आणि ‘व्हॅलेंटाईन डे’चं अनोखं कनेक्शन बघता विजयी झाल्यास आप पुन्हा एकदा 14 फेब्रुवारी रोजी शपथग्रहण समारंभ आयोजित करण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'

Delhi Election Result 2020 : दिल्लीतील दहा 'हॉट सीट'; जाणून घ्या कोण पुढे, कोण मागे?

Delhi Election Results : दिल्लीच्या निवडणुकीदरम्यान शेअर बाजारात उत्साह, सेन्सेक्स 41,300 अंकांच्या पार

Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

 

Web Title: Delhi Election Results know connection of arvind kejriwal and valentines day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.