शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

गंभीर नसता तर भाजपाची अवस्था झाली असती आणखी गंभीर; जाणून घ्या कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 17:33 IST

भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

नवी दिल्ली - केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ७० सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेमध्ये भाजपाला केवळ ८ जागांवर समाधान मानावे लागले. आपच्या झंझावातात दिल्लीतील लोकसभेच्या सातही मतदारसंघावर कब्जा असलेल्या भाजपाला यापैकी तीन मतदारसंघात खातेही उघडता आले नाही. मात्र माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या मतदरसंघातील काही मतदारांनी साथ दिल्याने भाजपावरील मोठी नामुष्की टळली. प्रचारादरम्यान वादग्रस्त वक्तव्य करणारे परवेश वर्मा, महिला नेत्या मीनाक्षी लेखी आणि भाजपाचे दिल्लीतील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन यांच्या मतदारसंघात भाजपाचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मात्र माजी क्रिकेटपटू आणि सध्या भाजपाचा खासदार असलेल्या गौतम गंभीरच्या मतदारसंघाने कमळाला साथ देत भाजपाची घसरगुंडी रोखली. गंभीर प्रतिनिधित्व करत असलेल्या जागा पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघात भाजपाने सर्वाधिक तीन जागा जिंकल्या. या मतदारसंघातील गांधीनगर, विश्वासनगर, लक्ष्मीनगर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलले. त्यामुळेच भाजपला आपला जाागांचा आकडा किमान ८ पर्यंत पोहोचवता आला. लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने या मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला होता. 

गंभीरप्रमाणेच भाजपाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या मनोज तिवारी यांच्या मतदारसंघातील मतदारांनीही भाजपाला थोडीशी साथ दिली. मनोज तिवारी हे प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातील घोंडा आणि रोहतासनगर येथे भाजपाचे उमेदवार विजयी झाले. 

अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव

Delhi Election Result: पंतप्रधान नरेंद्र मोदींना टक्कर देणार अरविंद केजरीवाल? 'आप'चा राष्ट्रीय राजकारणात शिरकाव

Delhi Election Results: केजरीवालपुत्राचा भाजपाला चिमटा; मुलीला तर कॉन्फिडन्सच होता!तर रमेश बिधुडी खासदार असलेल्या दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातील बदरपूर विधानसभा मतदारसंघ आणि हंसराज हंस खासदार असलेल्या पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघातील रोहिणी विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार विजयी झाले. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाGautam Gambhirगौतम गंभीरAAPआपPoliticsराजकारण