शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
3
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
4
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
5
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
6
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
7
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
8
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
9
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
10
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
11
बापरे! गुजरातच्या चहा विक्रेत्याला आयकर विभागाने पाठवली ४९ कोटींची नोटीस; नेमकं प्रकरण काय?
12
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!
13
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
14
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
15
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
16
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
17
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
18
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
19
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
20
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी

Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 10:00 AM

अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

ठळक मुद्देकेजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं.गेल्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विशेष पाहुण्यांची एका वेगळ्या व्यासपीठावर केजरीवाल यांच्यासोबत बसण्याची देखील आली आहे.

नवी दिल्ली - भाजपला धूळ चारून दणदणीत विजय मिळविलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी आज (16 फेब्रुवारी) रामलीला मैदानावर होणार आहे. केजरीवाल यांच्या शपथविधी सोहळ्याला अन्य राज्याचे मुख्यमंत्री किंवा राजकीय पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केलं गेलेलं नाही. दिल्लीतील सामान्य जनतेला या सोहळ्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले असून त्यांच्या साक्षीने हा सोहळा संपन्न होणार आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असून, त्याचा भव्य सोहळा करण्याचे आपने ठरविले आहे. राजधानीत राहणारा आम आदमी म्हणजे सर्वसामान्यांना या सोहळ्यात सहभागी करून घेतले जाणार आहे. यशानंतर आपमध्ये उत्साह आहे. 

अरविंद केजरीवाल यांच्यासह सहा जण मंत्रिपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्याला 50 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. दिल्लीचा कारभार करताना गेल्या पाच वर्षांमध्ये महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रांतील 50 जणांना आमंत्रित करण्यात आलं आहे. विशेष 50 जणांमध्ये डॉक्टर, शिक्षक, बाईक अ‍ॅम्बुलेन्स राइडर्स, सफाई कर्मचारी, कन्स्ट्रक्शन वर्कर्स, बस मार्शल, ऑटो ड्रायव्हर, अग्निशमन दलाचे जवान यांचा समावेश आहे. विशेष पाहुण्यांची एका वेगळ्या व्यासपीठावर केजरीवाल यांच्यासोबत बसण्याची देखील आली आहे.

मन्नी देवी, शबीना नाज, लाजवंती, सुंदरलाल, गजराज सिंह, डॉ. बृजेश कुमार, निधि गुप्ता, विजय सागर, मुरारी झा, चरण सिंह, अजीत कुमार, प्रिजिथ रेख, नजमा, सुमित नागल, लक्ष्मीकांत शर्मा, दलबीर सिंह यांच्यासह 50 विशेष पाहुण्यांना केजरीवाल यांच्या शपथविधी सोहण्यासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. 2015 च्या निकालाची पुनरावृत्ती करत आपच्या पारड्यात 62 जागा टाकल्या आहेत. तर भाजपाला 8 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीतही भोपळा फोडता आला नाही.  भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलन केजरीवाल यांनी रामलीला मैदानावर केले होते. त्यामुळे येथे आज शपथविधी सोहळा दिल्लीकरांच्या साक्षीने होणार आहे. 

'दिल्लीकरांनो... तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. तुमच्या मुलाला आशीर्वाद देण्यासाठी जरूर या' असं निमंत्रण अरविंद केजरीवाल यांनी सर्वसामान्य दिल्लीकरांना ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करून केलं आहे. 'जेव्हा भारतमातेच्या प्रत्येक मुलाला चांगले शिक्षण मिळेल. भारताच्या प्रत्येक नागरिकाला चांगले उपचार मिळतील. सुरक्षा व सन्मान महिलांमध्ये आत्मसन्मान निर्माण करेल. युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांनी त्यांच्या घामाचे मूल्य मिळेल. प्रत्येक भारतीयाला मुलभूत सुविधा मिळतील. धर्म, जात सोडून प्रत्येक  भारतवासी भारताला पुढे घेऊन जाईल तेव्हाच अमर तिरंगा आकाशात अभिमानाने फडकेल. तुमचा मुलगा तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहे. त्याला आशीर्वाद देण्यासाठी रामलीला मैदानावर सकाळी सहा वाजेपर्यंत जरुर या' असं निमंत्रण केजरीवालांनी व्हिडीओतून दिलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका

दूरसंचार कंपन्यांमुळे बँकांपुढेही संकट

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाdelhiदिल्ली