शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Delhi Election Results : 'आम्ही दिल्लीत सत्तेत येणार, 55 जागा जिंकणार', भाजपा नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 9:09 AM

Delhi Assembly Election Results 2020 Updates : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ठळक मुद्देसंपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.मनोज तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल आणि 55 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.'भाजपाने 55 जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको'

नवी दिल्ली -  संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीला मंगळवारी (11 फेब्रुवारी) सकाळी सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, तसेच गोपाल राय व आतिशी (सर्व आप), भाजपाचे आशीष सूद, तेजिंदरपाल बग्गा, विजेंदर गुप्ता आणि अरविंदरसिंह लवली, कृष्णा तीरथ, अलका लांबा हे महत्त्वाचे नेते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचेदिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी भाजपा बहुमताने सत्तेत येईल आणि 55 जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

मनोज तिवारी यांनी 'मी या निकालाबाबत आजिबात चिंताग्रस्त नाही. आजचा दिवस भाजपासाठी चांगला असेल असा मला विश्वास आहे. आज आम्ही दिल्लीत सत्तेत येणार आहोत. भाजपाने 55 जागा जिंकल्यास आश्चर्य वाटायला नको' असं म्हटलं आहे. मतमोजणी पूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 

जामिया मिलिया, जेएनयू व शाहीनबाग येथील सीएएविरोधी आंदोलन हे निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे बनले होते. ही निवडणूक आम आदमी पक्षासाठी अटीतटीची, भारतीय जनता पक्षासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नेतृत्व कसोटी पाहणारी, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई आहे. निवडणूक प्रचारात स्थानिक ते राष्ट्रीय मुद्दे प्रचारात गाजले. अनेक आयाराम-गयारामही यंदा रिंगणात उतरले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर चिखलफेक करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. आरोप-प्रत्यारोपांच्या या  मालिकेत मतदारांना आकर्षित करण्यासाठीही सर्वच पक्षांनी आतोनात प्रयत्न केले. 

दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण 70 जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. मात्र गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results Live: भाजपापेक्षा 'आप' तिपटीने पुढे; काँग्रेसचा 'चंचूप्रवेश'

Delhi Election Result 2020: निकालापूर्वीच भाजपानं स्वीकारला पराभव?, कार्यालयात लागले पोस्टर

IND vs NZ 3rd ODI Live Score: भारताला तिसरा धक्का; पृथ्वी शॉ माघारी

‘मी येते गं आई’ म्हणून घराबाहेर पडलेली ‘ती’ परतलीच नाही...

 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप