शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

Delhi Election Result: अमित शाहांचे पोस्टर झळकावून AAP कार्यकर्ते म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 2:26 PM

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात आपचे कार्यकर्ते जल्लोष करत असून, कार्यकर्ते ढोलताशांच्या गजरात नाचत आहेत. या जल्लोषातच आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर एक पोस्टर झळकावण्यात आला आहे. ज्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिसत आहेत. करंट लागला का?, अशी विचारणा अमित शाहांना या पोस्टरमधून करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते नाचतगाजत हे पोस्टर झळकावत आहेत. दिल्लीतल्या शाहीन बागचा मुद्दा हा निवडणुकीत भाजपाच्या केंद्रस्थानी होता. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला होता. एका सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले होते, दिल्लीकरांनो ईव्हीएमचं बटण एवढ्या जोरानं दाबा की मत इकडे मिळेल आणि करंट शाहीन बागमध्ये लागेल. तीच री पकडून आपच्या कार्यकर्त्यांनी अमित शाहांना करंट लागला का?, असं विचारत डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात प्रदर्शन करणाऱ्या शाहीन बागच्या आंदोलकांवर भाजपा सातत्यानं हल्ले चढवत आहे. अमित शाह यांच्यासह कपिल मिश्रा, परवेश वर्मासह प्रत्येक नेते शाहीन बागच्या आंदोलनाला आपची फूस असल्याची टीका करत आहेत. अमित शाह यांनीसुद्धा अनेक सभांमध्ये शाहीन बागचं आंदोलन हे राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचं सांगितलं होतं. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhi electionदिल्ली निवडणूक