"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:29 IST2025-01-14T10:28:50+5:302025-01-14T10:29:24+5:30
यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.

"मी देश वाचवण्यासाठी लढतोय अन् राहुल गांधी...!" अरविंद केजरीवाल यांचा हल्लाबोल
काँग्रेस नेते राहुल गांधी स्वतःचा पक्ष (काँग्रेस) वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, तर आपण देश वाचवण्यासाठी लढत आहोत. असे आम आदमी रक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटेल आहे. तत्पूर्वी, सीलमपूर भागात काँग्रेसच्या एका प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. यानंतर, काही वेळातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली.
यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते राहुल गांधी -
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. यावेळी, आपचे संयोजक देखील पंतप्रधानांप्रमाणेच प्रचार आणि खोटी आश्वासने देत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल या दोहोंनाही वाटते की, मागास, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यकांना भागिदारी मिळू नये. यामुळेच ते जातवार जनगणनेसंदर्भात गप्प आहेत.
राहुल गांधींनी करून दिली शीला दीक्षित यांच्या शासन काळाची आठवण -
अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधताना राहुल गांधी पुढे म्हणाले, "अरविंद केजरीवाल आले तेव्हा तुम्हाला आठवत असेल, शीला दीक्षित यांचे सरकार होते. केजरीवाल आले आणि प्रचार केला की आम्ही दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, आता काय झाले ते पहा. आम्ही घराबाहेर पडू शकत नाही, अत्यंत प्रदूषण आहे. अर्धे लोक आजारी आहेत, कर्करोग वाढत आहे. प्रदूषण वाढत आहे. भाव वाढतच आहेत. ते म्हणाले होते भ्रष्टाचार नष्ट करतील. तुम्हीच सांगा, केजरीवाल यांनी दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला का?" असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
आप आणि काँग्रेसचे संबंध बिघडले -
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A. मधील आप आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नव्हती. तेव्हापासूनच या दोन्ही पक्षांचे संबंध बिघडलेले आहेत. तत्पूर्वी, या दोन्ही पक्षांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक दिल्लीमध्ये एकत्रितपणे लढवली होती. तथापि, आता दोन्ही पक्ष ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढवत आहेत.