Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:09 IST2025-09-17T09:09:03+5:302025-09-17T09:09:59+5:30

Murder: उत्तर-पूर्व दिल्लीत एका २२ वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्राची चाकूने वार करून हत्या केली.

Delhi Crime: Man Kills friend over sisters suspected relationship | Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...

Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...

उत्तर-पूर्व दिल्लीत एका २२ वर्षांच्या तरुणाने त्याच्या मित्राची चाकूने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना सोमवारी (१६ सप्टेंबर २०२५) सकाळी भजनपुरा येथील सुभाष विहारमध्ये घडली. आरोपीला संशय होता की, मृताचे त्याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने मित्राची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि यमुना विहार येथील रहिवासी अभिषेक शर्मा उर्फ टिनू (वय, २८) हे चांगले मित्र होते आणि एकमेकांच्या घरी त्यांचे येणे-जाणे होते. काही दिवसांपूर्वी आरोपीला समजले की, अभिषेकचे त्याच्या १९ बहिणीसोबत प्रेमसंबंध आहेत. यामुळे आरोपीने अभिषेकला अनेक वेळा त्याच्या बहिणीपासून दूर राहण्यासाठी सांगितले. मात्र, वारंवार सांगूनही अभिषेक ऐकत नव्हता.

उपचारापूर्वीच मृत्यू
दरम्यान, सोमवारी सकाळी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला. संतापलेल्या आरोपीने अभिषेकवर चाकूने वार केले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा त्यांना अभिषेक रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. जखमी झालेल्या अभिषेकला लगेच जग प्रवेश चंद्र रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पुढील तपास सुरू
या घटनेनंतर फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आणि आवश्यक पुरावे गोळा केले. अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जीटीबी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Delhi Crime: Man Kills friend over sisters suspected relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.