शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरची अडचण आणखी वाढली! MD मनीष माहेश्वरी यांच्या विरोधात तक्रार दाखल; असं आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 07:35 IST

पोलिसांनी तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केली आहे आणि लवकरच याप्रकरणी एफआयआर नोंदवली जाऊ शकते.

नवी दिल्ली - नव्या आयटी नियमांवरून सरकारसोबत वाद सुरू असलेल्या ट्विटरच्या अडचणी सातत्याने वाढतच चालल्या आहेत. गाझियाबाद येथे एका वृद्धाला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कायद्याच्या कचाट्यात सापडलेले ट्विटर इंडियाचे एमडी आणखी एका अडचणीत अडकले आहेत. ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरींविरोधात दिल्ली येथे आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सांगण्यात येते, की धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि एका संस्थेविरोधात दिल्ली पोलीस सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तत्पूर्वी गाझियाबाद येथे वृद्धाला जालेल्या मारहाणीचा व्हिडिओ आणि भारताच्या वादग्रस्त नकाशासंदर्भातील प्रकरणावरून ट्विटर विरोधात गुन्हा नोंदवला गेला आहे. गाझियाबाद प्रकरणात तर ट्विटरच्या एमडींना नोटीसही जारी करण्यात आली आहे आणि आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. 

ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका

अॅव्होकेट आदित्यसिंह देशवाल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की ट्विटर कम्युनिकेशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ट्विटर इंडियाचे एमडी मनीष माहेश्वरी आणि ट्विटर इंडियाचे सार्वजनिक धोरण व्यवस्थापक शगुफ्ता कामरान यांच्या शिवाय रिपब्लिक एथेइस्टचे संचालक आणि सीईओ आर्मिन नवाबी आणि सुजाना मॅकिन्ट्री यांच्या विरोधातही एफआयआर नोंदविण्याची मागणी करण्यात आली आहे.लवकरच नोंदवली जाऊ शकते एफआयआर -देशवाल यांनी हिंदू देवीच्या फोटोसंदर्भातील एका पोस्टचा हवाला देताना म्हटले आहे, की ट्विटर युझर्सनी केलेली ही पोस्ट केवळ अपमानास्पदच नाही, तर समाजात शत्रुत्व आणि द्वेष पसरवणारीही आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर तपासाला सुरुवात केली आहे आणि लवकरच याप्रकरणी एफआयआर नोंदवली जाऊ शकते.

टॅग्स :Twitterट्विटरSocial Mediaसोशल मीडियाPoliceपोलिसdelhiदिल्ली