Video - दिल्लीच्या द्वारकामध्ये फिलिंग स्टेशनवर CNG सिलिंडरचा भीषण स्फोट; ४ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:16 IST2026-04-02T17:15:42+5:302026-04-02T17:16:41+5:30
दिल्लीतील द्वारका परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. एका फिलिंग स्टेशनवर सीएनजी सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना अचानक भीषण स्फोट झाला

Video - दिल्लीच्या द्वारकामध्ये फिलिंग स्टेशनवर CNG सिलिंडरचा भीषण स्फोट; ४ जण जखमी
दिल्लीतील द्वारका परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. एका फिलिंग स्टेशनवर सीएनजी सिलिंडरमध्ये गॅस भरत असताना अचानक भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत किमान चार जण जखमी झाले आहेत.
स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आणि लोकांची पळापळ सुरू झाली. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा स्फोट मित्रांऊ गावातील एका सीएनजी पंपावर झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. जखमी झालेल्या चारही व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.
#BREAKING-द्वारका में CNG सिलेंडर फटा, 4 घायल
— Payall Singhh (@PayallSingh13) April 2, 2026
दिल्ली के द्वारका क्षेत्र में गैस भरते समय धमाका, 1 की हालत नाजुक। अधिकारियों ने जांच शुरू कर दी है।#Dwarka#CNGBlast#DelhiNews#BreakingNews#सुरक्षितरहें
(Delhi Police, health dept, fire dept) pic.twitter.com/wX0Fmy0flX