दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? अरविंद केजरीवालांना पेन्शन किती मिळेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:37 IST2025-02-24T13:35:23+5:302025-02-24T13:37:41+5:30

आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहे.

delhi cm rekha gupta salary and facilities, arvind kejriwal pension know details | दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? अरविंद केजरीवालांना पेन्शन किती मिळेल? जाणून घ्या...

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? अरविंद केजरीवालांना पेन्शन किती मिळेल? जाणून घ्या...

नवी दिल्ली : दिल्लीत नुकतेच भाजपचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह ६ मंत्र्यांनीही शपथ घेतली आहे. शपथ घेतल्यानंतर दिल्लीचे नवे सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे.  आजपासून दिल्ली विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. 

आता दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना वेतन किती मिळणार? याबाबत चर्चा सुरू आहे. तर, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना दरमहा १.७० लाख रुपये वेतन मिळेल. दरम्यान, हे वेतन मार्च २०२३ च्या आदेशानुसार निश्चित करण्यात आले आहे. ज्यामध्ये मूळ वेतन ६०,००० रुपये आहे. याशिवाय, त्यांना इतर भत्तेही मिळतील.

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना कोणते भत्ते मिळतील?
६०,००० रुपयांच्या मूळ वेतनाव्यतिरिक्त दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ३०,००० रुपये विधानसभा भत्ता, २५,००० रुपये सचिवीय सहाय्य, १०,००० रुपये टेलिफोन भत्ता, १०,००० रुपये प्रवास भत्ता आणि १,५०० रुपये दैनिक भत्ता मिळतो.

मुख्यमंत्र्यांना 'या' सुविधा मिळतील 
- वेतनासोबतच दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना गाडी आणि बंगल्यासह अनेक सुविधा मिळतील.
- मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हेलिकॉप्टर, सरकारी गाडी आणि अधिकृत वाहनासाठी दरमहा ७०० लिटर मोफत पेट्रोल मिळेल.
- जर मुख्यमंत्री त्यांची खाजगी गाडी वापरत असतील तर त्यांना दरमहा १०,००० रुपये मिळतील.
- तसेच, मुख्यमंत्र्यांना एक सरकारी निवासस्थान देखील मिळते, ज्यामध्ये अनेक सुविधा उपलब्ध आहेत.
- याशिवाय, दरमहा ५,००० युनिट वीज मोफत मिळेल.
- मुख्यमंत्री त्यांच्या कार्यकाळात १२ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात.

अरविंद केजरीवाल यांना किती मिळेल पेन्शन?
आपचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना किती रुपयांची पेन्शन मिळू शकते. याबद्दलही सध्या चर्चा सुरु आहे. तर अरविंद केजरीवाल यांना माजी आमदारांप्रमाणे १५,००० रुपये पेन्शन मिळेल. जर एखादा आमदार एकापेक्षा जास्त वेळा जिंकला तर ही रक्कम १,००० रुपयांनी वाढते, अशीही तरतूद आहे. 

दरम्यान, अरविंद केजरीवाल हे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे ते माजी मुख्यमंत्री म्हणून सरकारी निवासस्थानाची विनंती करू शकतात. तसेच, माजी मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांना सरकारी निवासस्थान, सरकारी गाडी आणि ड्रायव्हर मिळू शकतो. याशिवाय, त्यांना टेलिफोन, इंटरनेट, प्रवास भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधा देखील मिळतील.

Web Title: delhi cm rekha gupta salary and facilities, arvind kejriwal pension know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.