दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 06:33 AM2024-03-23T06:33:05+5:302024-03-23T06:33:38+5:30

ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी केल्याचा आराेप

Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ दिवस ईडी कोठडी; कार्यकर्ते रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : शंभर कोटींच्या कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याचे ‘सूत्रधार’ दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांची शुक्रवारी पीएमएलए न्यायालयाने २८ मार्चपर्यंत ईडी कोठडीत रवानगी केली.

केजरीवाल यांना राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल एस.व्ही. राजू आणि झोएब होसैैन यांनी, तर केजरीवाल यांच्या वतीने अभिषेक सिंघवी, रमेश गुप्ता आणि विक्रम चौधरी यांनी तीन तास जोरदार युक्तिवाद केला. केजरीवाल यांनी ईडीचे अधिकारी कपिल राज आणि सत्यव्रत यांची हेरगिरी करणारा १५० पानांचा अहवाल त्यांच्या घरी सापडल्याचा आरोप ईडीने केला.
हा केवळ शंभर कोटींचाच घोटाळा नसून लाच देणाऱ्यांनी कमावलेल्या नफ्यातून सहाशे कोटींचाही समावेश असल्याचा दावा एस. व्ही. राजू यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करताना दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी व आपचे कार्यकर्ते. पोलिसांनी त्यांना अटक करुन अन्यत्र सोडले.

 

  • अटक चुकीची : अभिषेक सिंघवी

- निवडणुकीपूर्वी पक्षाच्या अव्वल नेतृत्वाला केलेली अटक चुकीची आहे. 
- या प्रकरणातील ८० टक्के आरोपींनी केजरीवाल यांचा संबंध नसल्याचे म्हटले आहे.
- अटकेचा अधिकार व अटकेची गरज समतुल्य नाही. असा दावा सिंघवी यांनी केला.

Web Title: Delhi CM Arvind Kejriwal in ED custody for 6 days; Activists on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.