शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत सहावीच्या विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:08 IST

गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

नवी दिल्ली : दिल्लीतील वसंत विहार येथील चिन्मय शाळेत सहावीत शिकणाऱ्या एका १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मंगळवारी (३ डिसेंबर) संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेप्रकरणी आज मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 

गुरुवारी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासोबतच दोन पद्धतीचा तपास करण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलीस ज्याप्रकारे घाईघाईने वागत आहेत, त्यावरून ते आरोपींना वाचवत असल्याचा आरोप मुलाचे वडील सागर यांनी केला आहे.

मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, दोन दिवसांपूर्वी वसंत विहार येथील शाळेत विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. हे संशयास्पद प्रकरण आहे, असे काय घडलं, ज्यामुळं मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शाळेच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला असेल तर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. आम्ही दोन प्रकारच्या तपासाचे आदेश दिले आहेत. शाळेच्या भूमिकेची शिक्षण विभाग चौकशी करणार आहे. तर विद्यार्थ्याला रुग्णालयात नेण्यात काही विलंब झाला का? हे पाहण्यासाठी एसडीएमकडून दुसरी चौकशी केली जाईल. या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले.

याचबरोबर, असे काय घडत आहे की, सहावीच्या वर्गातील मुले एवढ्या हिंसकपणे मारामारी करत आहेत? याची चौकशी करावी लागेल, त्यासाठी दिल्लीतील सर्वांना एकत्र यावे लागेल. आज मुलं रोज हिंसाचाराच्या बातम्या पाहत आहेत. संपूर्ण समाजात गुन्ह्यांच्या बातम्या येत आहेत. याचा परिणाम मुलांवर होत आहे, असेही मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या.

पोलीस आरोपींना वाचवत आहेत - वडिलांचा आरोपयाप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप केला आहे. ते म्हणाले की, शाळा आणि पाच मुलांना वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत, असा आम्हाला संशय आहे. मुलं त्याचा गळा दाबत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. १०-११ वीच्या एका मुलानं येऊन त्याचा गळा आवळून खून केला होता. तसेच, त्या दिवशीही पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार घाईघाईने करण्यास सांगितले. यासाठी काल सकाळी पोलिसांनी घाईघाईने बळाचा वापर केला आणि लाठीचार्जही झाला.

टॅग्स :Atishiआतिशीdelhiदिल्लीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी