जैश-ए-मोहम्मदच्या फिदायीन मॉड्यूलशीसंबंधित, अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टरांच्या चौकशीतून आणि त्यांच्या मोबाईलच्या फॉरेन्सिक तपासातून तपास यंत्रणांना अनेक धक्कादायक आणि मोठे पुरावे मिळाले आहेत. या तपासात आढळून आले आहे की, या आरोपींनी 'सिग्नल' ॲपवर एक ग्रुप तयार केला होता. याचा ॲडमिन मॉड्यूलचा म्होरक्या डॉ. मुझफ्फर होता. तो सध्या फरार आहे. तसेच, डॉ. उमर, डॉ. मुजम्मिल, डॉ. आदिल आणि डॉ. शाहीन हेदेखील या ग्रूपमध्ये होते.
ग्रूपमध्ये डॉ. उमरची भूमिका सर्वात मोठी - तपास यांत्रनांच्या तपासात, या मॉड्यूलमध्ये डॉ. उमरची भूमिका सर्वात मठी आणि महत्त्वाची होती, हे स्पष्ट झाले आहे. तो जेव्हा-जेव्हा अमोनियम नायट्रेट, TATP (ट्रायएसिटोन ट्रायपॅरॉक्साइड) किंवा इतर स्फोटक रसायनं खरेदी करायचा, तेव्हा-तेव्हा त्यासंदर्भात या ग्रूपवर माहिती टाकत असे. यात, ते किती प्रमाणात आहे, स्रोत कुठला आहे आणि पुढील तयारी काय आहे, आदी माहिती असे. महत्वाचे म्हणजे, अमोनियम नायट्रेट, सल्फर डायऑक्साइडसह बहुतेक स्फोटक रसायने, टाइमर, वायर यांसारख्या गोष्टी उमरनेच खरेदी केल्या होत्या, असे डिजिटल फुटप्रिंट्समधून सिद्ध झाले आहे.
यानंतर, खरेदी करण्यात आलेले स्फोटक साहित्या सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी डॉ. मुजम्मिलकडे सोपवण्यात आली होती. ही स्फोटके त्याच्या भाड्याच्या घरात हलवण्यात येत होती. स्फोटके सुरक्षित आहेत, हा मेसेज देण्यासाठी मुजम्मिल त्यांचा फोटो काढून ग्रुपवर शेअर करत होता.
आणखी एका हँडलरचे नाव समोर - चौकशीदरम्यान 'जैश-ए-मोहम्मद'शी संबंधित फैसल इशाक भट्ट या हँडलरचे नावही तपासात समोर आले आहे. स्फोटके जमवणे, त्याची चाचणी, तयारी आणि मॉड्यूलशी संबंधित इतर सर्व माहिती डॉ. उमर रोज या हँडलरला देत होता. फरार मुझफ्फर अफगाणिस्तानला गेल्यानंतर, हाच हँडलर संपूर्ण मोड्यूल सांभाळत होता. महत्वाचे म्हणजे, सौदी अरेबियाच्या (+966 कोड) व्हर्च्युअल नंबरवरून हाच हँडलर या मॉड्यूलचे संचालन करत होता. आता याचा खरा चेहरा मोर आण्याच्या दृष्टीनेही तपास यंत्रणा काम करत आहेत.
महत्वाचे म्हणजे, 'फैसल इशाक भट्ट' हे कश्मिरी नाव, तो काश्मिरी असल्याचे भासण्यासाठी वापरले गेले असावे, असी शंका तपास यंत्रणांना आहे. आतापर्यंत तपास यंत्रणांना जैश-ए-मोहम्मदच्या अबू उकाशा, हंजुल्लाह, निसार आणि फैसल इशाक भट्ट ही चार पाकिस्तानी हँडलर्सची नावे समोर आली आहेत.
Web Summary : Investigation reveals Jaish-e-Mohammed module used Signal app. Dr. Umar procured explosives, Dr. Muzammil stored them. Handler Faisal Bhat's role exposed, possibly a Pakistani national operating from Saudi Arabia.
Web Summary : जांच में जैश-ए-मोहम्मद मॉड्यूल द्वारा सिग्नल ऐप का उपयोग सामने आया। डॉ. उमर ने विस्फोटक खरीदे, डॉ. मुजम्मिल ने उन्हें संग्रहीत किया। हैंडलर फैसल भट की भूमिका उजागर, संभवतः सऊदी अरब से संचालित पाकिस्तानी।