दिल्लीमध्ये झालेल्या भीषण अपघातात भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातील डेप्युटी सेक्रेटरी नवजोत सिंग यांचा मृत्यू झाला. तर पत्नी संदीप कौर गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. नवजोत यांचा २१ वर्षीय मुलगा नवनूर सिंगचा आज वाढदिवस आहे. आपल्या पालकांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी तो खूप उत्सुक होता. त्याला त्याच्या पहिल्या पगारातून पालकांसाठी गिफ्टही घ्यायचं होतं. त्याला त्याच्या वडिलांसाठी घड्याळ आणि आईसाठी कानातले खरेदी करायचे होते. पण त्याआधीच आई-वडिलांचा अपघात झाला.
नवनूर सिंगने TOI ला दिलेल्या माहितीनुसार, "आई-वडील हे खूप चांगले मित्र होते. ते दर आठवड्याच्या शेवटी छोट्या डेटवर जायचे. माझे वडील ऑफिसला गाडीने जायचे, पण जेव्हा माझ्या आईला बाहेर घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा ते बाईकनेच जायचे. आम्ही १ सप्टेंबर रोजी आई-बाबांच्या लग्नाचा २३ वा वाढदिवस साजरा केला. आता माझ्या वाढदिवशी मी त्यांना पहिल्या पगारातून घेतलेलं गिफ्ट देऊ शकणार नाही."
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
"मी घड्याळ आधीच निवडलं होतं. वडिलांना काय हवं आहे आणि ते किती आनंदी होतील हे मला अगदी माहित होतं. माझ्या आईसाठी मी तिला आवडतील असे कानातले निवडले होते. मी तिला ते देण्यासाठी उत्सुक होतो. पण त्याआधीच हे घडलं." नवजोत सिंग यांची पत्नी संदीप कौर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोपी महिलेला म्हटलं की, प्लीज, आम्हाला जवळच्या रुग्णालयात घेऊन चला, परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं.
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
बीएमडब्ल्यू चालक महिला आणि तिच्या पतीने जाणूनबुजून जवळच्या रुग्णालयाऐवजी १९ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान रुग्णालयात नेलं असा आरोप संदीप कौर यांनी केला आहे. "माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते पण प्राथमिक उपचार मिळाले नाहीत" असं संदीप कौर यांनी सांगितलं. एका कार्गो व्हॅनमधून नेण्यात आलं ज्यामध्ये रक्तस्त्राव झालेल्या नवजोत यांना कोणत्याही प्राथमिक उपचाराशिवाय तसंच ठेवण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी नवजोत सिंग यांना मृत घोषित केलं.