मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 09:16 IST2025-09-17T09:15:47+5:302025-09-17T09:16:13+5:30

Delhi BMW Accident: काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या एका विचित्र आणि भीषण अपघातात परराष्ट्र मंत्रालयातील उपसचिव नवज्योत सिंग यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने नवज्योत सिंग यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, काल सिंग यांच्या कुटुंबामध्ये भावूक करणारी घटना घडली. १

Delhi BMW Accident: Father's last gift arrives on son's birthday, family breaks down in tears | मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर

मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर

काही दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्या एका विचित्र आणि भीषण अपघातात परराष्ट्र मंत्रालयातील उपसचिव नवज्योत सिंग यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने नवज्योत सिंग यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, काल सिंग यांच्या कुटुंबामध्ये भावूक करणारी घटना घडली. १६ सप्टेंबर रोजी नवज्योत सिंग यांच्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस होता. मात्र यावर्षी मुलाच्या वाढदिवसाला वडील घरात नसल्याने हा दिवस सिंग कुटुंबीयांसाठी खूपच दु:खदायी ठरला.

नवज्योत सिंग यांनी वाढदिवसादिवशी मुलाला भेट देण्यासाठी एक गिफ्ट ऑनलाईन बुक करून ठेवलं होतं. ते गिफ्ट काल घरी पोहोचलं. हे गिफ्ट आलं तेव्हा ते स्वीकारणारे तिथे उपस्थित होते. मात्र ज्यांनी हे गिफ्ट बुक केलं होतं, ते नवज्योत सिंग मात्र आता या जगात नव्हते. त्यामुळे वडिलांनी दिलेली ही भेट स्वीकारताना मुलासह कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.

दरम्यान, मुलाच्या वाढदिवसादिवशीच वडील नवज्योत सिंग यांच्यावर बीरीवाला बाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. ज्या दिवशी मुलगा वडिलांच्या हातातून केक कापून वाढदिवस साजरा करायचा. त्याच दिवशी वडिलांच्या मृतदेहाला खांदा देण्याची आणि चितेला अग्नी देण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर आली.  यावेळी नवज्योत सिंग यांच्या पत्नी संदीप कौर यांनाही अश्रू अनावर झाले.

रविवारी नवज्योत सिंग हे पत्नी संदीप कौर यांच्यासोबत दुचाकीवरून जात असताना दिल्लीतील एका रस्त्यावर बीएमडब्ल्यू कार आणि बसच्या खाली दुचाकी सापडून हा अपघात झाला होता. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ३८ वर्षीय गगनप्रीत मक्कड नावाच्या महिलेला अटक केली आहे. तपासामध्ये तिने मद्यपान केलं नसल्याचं उघडकीस आलं आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये सदर कार ही आधी दुभाजकाला धडकून, उलटत असल्याचे आणि तिथून जात असलेली नवज्योत सिंग यांची दुचाकी तिला धडकल्याचे दिसत आहे.  

Web Title: Delhi BMW Accident: Father's last gift arrives on son's birthday, family breaks down in tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.