त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:11 IST2025-11-13T07:10:48+5:302025-11-13T07:11:49+5:30
Delhi Blast Update: लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन शाहिदच्या मोठ्या भावाने बुधवारी आपल्या बहिणीच्या दहशतवादी कारवायांशी असलेल्या कथित संबंधांबाबत अविश्वास व्यक्त केला.

त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
लखननौ / कानपूर - लाल किल्ला स्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या डॉ. शाहीन शाहिदच्या मोठ्या भावाने बुधवारी आपल्या बहिणीच्या दहशतवादी कारवायांशी असलेल्या कथित संबंधांबाबत अविश्वास व्यक्त केला. ती कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी असू शकते, यावर कुटुंबाचा विश्वास बसत नाही, असे त्याने म्हटले आहे. तर दुसरीकडे, तिच्या माजी पतीने पती डॉ. जफर हयातने सांगितले की, तिने तिच्या विवाहित जीवनात कधीही बुरखा घातला नव्हता. ती तिच्या मुलांची प्रेमळ, काळजी घेणारी आई होती आणि चांगले जीवन जगण्यासाठी परदेशात जाऊ इच्छित होती. शाहीनचा भाऊ मोहम्मद शोएब म्हणाला की, एटीएसने कुटुंबाला त्यांनी सन्मानजनक वागणूक दिली.