ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 03:22 IST2025-11-11T03:21:35+5:302025-11-11T03:22:19+5:30
Delhi Blast News: दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, प्राथमिक तपासामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत.

ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटात ८ जणांच मृत्यू झाला, तर २० हून अधिक जण जखमी झाले. सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा प्रभाव दिसून आला. दरम्यान, प्राथमिक तपासामधून हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळत आहेत. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यात आणखी काही लोक होते, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे एवढा मोठा स्फोट झाल्यानंतरही घटनास्थळावर कुठल्याही प्रकारचा खड्डा तयार झाला नाही. तसेच एकाही मृत किंवा गंभीर जखमी व्यक्तीला खिळे किंवा छर्रै लागलेले नाहीत. तसेंच जखमी आणि मृतांचं शरीर काळं पडलेलं नाही. त्यामुळे या स्फोटाबाबतचं गुढ अधिकच वाढलं आहे.
आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले त्यात हा पॅटर्न वापरण्यात आलेला नाही. कारण सर्वसाधारणपणे दहशवादी हल्ल्यातील स्फोटांमध्ये खिळे तारा आणि छर्रे हमखास सापडतात. तसेच या स्फोटांमध्ये जे जखमी होतात किंवा मृत्युमुखी पडतात त्यांचं शरीर काळं पडतं. तसेच जिथे स्फोट होतो तिथे खड्डेही तयार होतात. मात्र दिल्लीत स्फोटांनंतर पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वसामान्य स्फोट नव्हता, तर एक मोठा स्फोट होता. त्याचा प्रभाव सुमारे २०० मीटरपर्यंत दिसून आला. हा स्फोट आतापर्यंतच्या दहशतवादी हल्ल्यांच्या पॅटर्नपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. प्राथमिक तपासामध्ये हा स्फोट म्हणजे दहशतवादी हल्ला असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, एका अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत जेवढे दहशतवादी हल्ले झाले आहेत. त्यामध्ये खिळे, तारा, लोखंडाचे तुकडे सापडले होते. मात्र या स्फोटानंतर असं काही सापडलेलं नाही. त्यामुळे पोलीस सध्या सर्व शक्यतांबाबत विचार करत आहे. एनआयए आणि फॉरेन्सिक टीमसुद्धा या स्फोटाचा अवाका, वापरण्यात आलेली स्फोटके आणि संभाव्य आरोपींची ओळख पटवण्यात गुंतली आहे.