"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:02 IST2025-11-12T15:01:35+5:302025-11-12T15:02:16+5:30
डॉ. शाहीन जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनात ही महिला शाखा आहे. त्याची भारतातील जबाबदारी शाहीनवर सोपवली होती

"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
मुंबई - दिल्लीस्फोटानंतर जैश ए मोहम्मदच्या महिला विंगची प्रमुख डॉ. शाहीन चर्चेत आली आहे. फरीदाबाद येथून डॉ. शाहीन आणि तिचा भाऊ डॉ. परवेज यांच्याबाबत अनेक खुलासे समोर आलेत. त्यात शाहीन दहशतवादी संघटनेच्या महिला विंगची जबाबदारी सांभाळत होती, त्याशिवाय तिच्यावर जास्तीत जास्त महिलांना संघटनेत सामील करण्याचं काम सोपवले होते. डॉ. शाहीनबाबत विविध माहिती समोर येत आहे. त्यात तिचे लग्न हयात जफर यांच्याशी झालं होते, त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोट झाल्याचं बोलले गेले. आता या प्रकरणी डॉ. हयात जफर यांनी भाष्य केले आहे.
हयात जफर म्हणाले की, आमचे लग्न अँरेज मॅरेज झाले होते. माझ्या लग्नानंतर २०१२ साली शाहीनसोबत तलाक झाला होता. त्यानंतर ती कुठे आहे हे मला माहिती नव्हते. ना मी कधी तिच्याशी संपर्क केला होता. आम्हाला २ मुले होते, दोघेही माझ्यासोबत राहतात. धर्माबद्दल इतकी जागरुकता मी कधी पाहिली नव्हती. ती उदारमतवादी होती. आपण ऑस्ट्रेलिया किंवा युरोपात वास्तव्य करावे असं तिला वाटत होते. त्यावरूनच आमचे वाद झाले. तिने असं का केले, हे तीच सांगू शकते असं त्यांनी म्हटलं.
Kanpur: Jafar Hayat, ex-husband of one of the Faridabad terror module accused Dr Shaheen, says, “What reaction can I have to this? I have had no connection or relationship with him never have. Around 2012–2013, both of us were serving as doctors; we were young and living well.… pic.twitter.com/FVlpmT0lI7
— IANS (@ians_india) November 12, 2025
डॉ. शाहीन जैश ए मोहम्मदची जमात उल मोमिनात ही महिला शाखा आहे. त्याची भारतातील जबाबदारी शाहीनवर सोपवली होती. मसूद अजहरची बहीण सादिया अजहर पाकिस्तानात जैशच्या महिला विंगची प्रमुख आहे. सादिया अजहरचा पती युसूफ अजहर हा कंधार हायजॅकचा मास्टरमाइंड होता. शाहीन एकूण ३ भाऊ बहीण होते, त्यातील मोठ्या भावाचे नाव शोएब होते. दुसऱ्या नंबरवर शाहीन तर सर्वात छोटा भाऊ परवेज होता. कानपूरमधील नोकरी गेल्यानंतर शाहीन फरीदाबादला गेली होती. तिचे लग्न महाराष्ट्रात राहणाऱ्या हयात जफर यांच्याशी झाले होते, परंतु त्यांच्यात घटस्फोट झाला आहे. शाहीनने २५ वर्षापूर्वी प्रयागराज येथून मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर लोकसेवा आयोगातून तिची निवड गणेश शंकर विद्यार्थी मेडिकल कॉलेजच्या सहाय्यक प्राध्यापकपदी झाली. त्यानंतर २०१३ साली कुणालाही न सांगता ती अचानक गायब झाली.
दरम्यान, मागील वर्षापासून माझी आणि मुलीची भेट झाली नाही. एक महिन्यापूर्वी आमचे बोलणे झाले होते. माझ्या मुलीबाबत जे काही सांगितले जात आहे, त्यावर माझा विश्वास नाही असं तिचे वडील म्हणाले. तर दर आठवड्याला माझी मुलगा परवेजसोबत बोलणे होते. सोमवारी तो एका लग्नासाठी बाहेर होता, त्यामुळे त्याच्याशी बोलणे झाले नाही. तो मला वारंवार भेटायला येत होता. जर तो आला नाही तरी दर रविवारी त्याच्याशी फोनवर बोलणे व्हायचे असं वडिलांनी सांगितले.